ETV Bharat / state

सत्ता स्थापनेचा घोळ घालून अप्रत्यक्ष सरकार हाकणे घटनाविरोधी, सामनातून मुख्यमंत्र्यावर टीका - उद्धव ठाकरे बातमी

सत्ता स्थापनेचा घोळ घालायाचा आणि अप्रत्यक्षपणे सरकार हाकायचा हे घटनाविरोधी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. शिवाय फडणवीस यांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:49 AM IST

मुंबई- सत्ता स्थापनेचा घोळ घालायाचा आणि अप्रत्यक्षपणे सरकार हाकायचा हे घटनाविरोधी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. शिवाय फडणवीस यांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.

दिल्लीत गढूळ वातारण असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्र्यांना लावण्यात आला आहे. राज्यात काय घडत आहे हे प्रत्येक नागरिकाला जाणून घ्यायचे आहे. भाजपला आणि शिवसेनेला निवडणुकीत अपेक्षित जागांचा आकडा गाठता आला नसला तरी महागाईचे आकडे मात्र, वाढत आहे. गॅस आणि भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. ते कमी होणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, हे काम दिल्लीतील धुक्यात विमान उतरवण्यासारखे आहे. सत्ता स्थापनेचा घोळ घालून खोळंबा करायचा आणि अप्रत्यक्षपणे सत्ता हाकायची हे घटनाविरोधी आहे. मोकळ्या वातावरणात नवे सरकार यावे ही अपेक्षा आहे. दिल्लीला जरी गढूळ वातावरण असले तरी महाराष्ट्रातील जनतेला लख्ख प्रकाशात सर्व दिसत आहे. यातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नसल्याचा इशारा भाजप सरकारला दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पावले उचलावे, त्यावरच महाराष्ट्राची दिशा ठरेल असेल असे म्हटले आहे.

Intro:Body:

सत्ता स्थापनेचा घोळ घालून अप्रत्य सरकार हाकणे घटनाविरोधी, सामनातून मुख्यमंत्र्यावर टीका  

 मुंबई- सत्ता स्थापनेचा घोळ घालायाचा आणि अप्रत्यक्षपणे सरकार हाकायचा हे घटनाविरोधी असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधुन करण्यात आली आहे. शिवाय फडणवीस यांचा उल्लेख मावळते मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.  

दिल्लीत गढूळ वातारण असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचे काम केले, त्याबद्दल त्यांचे कौतुक असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्र्यांना लावण्यात आला आहे. राज्यात काय घडत आहे हे प्रत्येक नागरिकाला जाणून घ्यायचे आहे. भाजपला आणि शिवसेनेला निवडणुकीत अपेक्षित जागांचा आकडा गाठता आला नसला तरी महागाईचे आकडे मात्र, वाढत आहे. गॅस आणि भाजीपाल्याचे दर वाढत आहेत. ते कमी होणे आवश्यक आहे.  

मुख्यमंत्री बहुमताचा आकाडा जुळवण्यासाठी कामाला लागले आहेत. मात्र, हे काम दिल्लीतील धुक्यात विमान उतरवण्यासारखे आहे. सत्ता स्थापनेचा घोळ घालून खोळंबा करायचा आणि अप्रत्यक्षपणे सत्ता हाकायची हे घटनाविरोधी आहे. मोकळ्या वातावरणात नवे सरकार यावे  ही अपेक्षा आहे. दिल्लीला जरी गढूळ वातावरण असले तरी महाराष्ट्रातील जनतेला लख्ख प्रकाशात सर्व दिसत आहे. यातून अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नसल्याचा इशारा भाजप सरकारला दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पावले उचलावे, त्यावरच महाराष्ट्राची दिशा ठरेल असेल असे म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.