ETV Bharat / state

सत्तेचे टॉनिक संपल्याने भाजपची सूज उतरली; सेनेचा भाजपवर 'सामना'तून बाण

धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील 'मेकअप' उतरल्याचे म्हणत शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 10, 2020, 10:21 AM IST

मुंबई - राज्यात नागपूर, नंदुरबार, धुळे, वाशिम, पालघर, अकोला या सहा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी केवळ धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली आहे. यावरून भाजपच्या थापेमारीला वैतागलेल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. धुळे वगळता भाजपच्या चेहऱ्यावरील 'मेकअप' उतरल्याचे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

थापेबाजी कंटाळून नागपूरच्या जनतेने धक्कादायक बदल घडवले

भाजपचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या नागपूरमध्येही भाजपला सत्ता टिकवता आली नाही. त्या ठिकाणीही काँग्रेसने मुसंडी मारली आहे. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरींच्या गावातही भाजपचा पराभव झाला आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने मुसंडी मारली होती. पण, नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 पैकी 40 जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. याचे कारण ग्रामीण भागातील जनता भाजपच्या बकवास थापेबाजी कंटाळली असल्याने जिल्ह्यात धक्कादायक बदल घडले असल्याचे सामनातून सांगण्यात आले.

भाजपचे नामोनिशाण मिटले

नंदुरबारची सत्ता भाजपने गमवाली आहे. त्या नैराश्येपोटी त्यांनी अक्कलकुवा येथील सेनेच्या कार्यालयावर हल्ला घडवून जाळपोळ करण्यापर्यंत त्यांच्या भाडोत्री गुंडांची मजल गेल्याचे सामनामध्ये लिहिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे स्वतःचे काहीच अस्तित्व नाही. राष्ट्रवादीतील विजयकुमार गावीत व अन्य नेत्यांना भाजपने आयात केल्यामुळे जिल्ह्यात भाजपचे झेंडे दिसू लागले. पण, राज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकांचा निकालातून भाजपचे सत्य बाहेर आले आहे. पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने 18 जागांवरील ताबा कायम ठेवला. पण, भाजप 21 वरून 12 वर घसरला. भाजप घसरल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असून राष्ट्रवादी 4 वरून 14 वर गेली. अकोल्यात वंचित बहुजन आघाडी, तर वाशिमला राष्ट्रवादीस चांगल्या जागा मिळवल्या. सर्व जिल्ह्यांवर पूर्वी भाजपची सत्ता होती. पण, महाराष्ट्राची सत्ता गमावल्याने जिल्हा परिषदाही रिकाम्या झाल्या आहेत. यावरून धुळे वगळता भाजपचे नामोनिशाण मिटल्याचे सेनेने सामनातून म्हटले आहे.

सत्तेचे टॉनिक संपल्याने सूज उतरली

नागपूर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील सत्ता हेच भाजपचे ‘टॉनिक’ होते. ते टॉनिकच संपल्यामुळे बाळसं म्हणून दिसणारी सूज उतरली आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, 'सामना'तून भाजपला टोला

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.