मुंबई - येथील मानखुर्द वॉर्ड क्रमांक १३५च्या शिवसेना नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त (१५ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, 'मुख्यमंत्री मदत योजनेस' एक लाख रुपये मदत केली आहे. तसेच, मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये सक्रे यांच्या वाढदिवसानिमीत्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचे जार वाटप केले.
संपूर्ण जगभर कोरोना विरुद्धची लढाई सुरू असताना, त्यासाठी आर्थिक निधीची अडचण भासत आहे. ही अडचण काही प्रमाणात कमी व्हावी यासाठी अनेकजण मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वॉर्ड क्रमांक, १३५मधील नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमीत्त साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत, त्यांच्याकडे 'मुख्यमंत्री मदत योजने'स एक लाख रुपयांचा मदत निधी दिला. तसेच, मानखुर्द पोलीस चौकी, वाहतूक पोलीस चौकी आणि स्थानिक पोलीस बीटला शिवसेना कार्यकर्त्यांनी पाण्याचे जार वाटप केले.
हेही वाचा - किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री सचिवालयामार्फत होणार- मुख्यमंत्री