ETV Bharat / state

दबावामुळेच शिवसेनेची भाजपशी युती - एकनाथ गायकवाड - एकनाथ गायकवाड

घाटकोपर पूर्व येथील काँग्रेस उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर "ई टीव्ही भारत"शी ते बोलत होते.

एकनाथ गायकवाड
author img

By

Published : Oct 8, 2019, 7:12 PM IST

मुंबई - 'शिवसेनेच्या काही गोष्टी भाजपला माहीत होत्या. त्यामुळे शिवसेना दबावाखाली होती. या दबावाखाली त्यांना कितीही कमी जागा दिल्या असत्या तरी त्यांनी लढवल्या असत्या,' असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी लगावला आहे.

एकनाथ गायकवाड

हेही वाचा- ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?

घाटकोपर पूर्व येथील काँग्रेस उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर "ई टीव्ही भारत"शी ते बोलत होते. यावेळी बोलताना 'निवडणुकीचे चित्र स्पष्टच होते. भाजपला सोडून शिवसेना जाऊ शकत नाही. त्यांच्या काही गोष्टी भाजपला माहीत असतील. म्हणून साहजिकच शिवसेनेवर दबाव होता. या दबावाखाली त्यांनी 124 काय 80 जागा दिल्या असत्या तरी त्यांनी लढवल्या असत्या,' असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

'काँग्रेस, राष्ट्रवादी व त्यांचे इतर पक्ष सेक्युलर पक्ष आहेत. आम्हाला देशात लोकशाही टिकवायची आहे. देशाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. एकत्र कार्यक्रम व एकत्र जाहीरनामा घेवुन लढत आहोत. आमच्या शपथनाम्यात जी आश्वासने दिली आहेत, त्यांना आम्ही बांधील आहोत. बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे तसेच जोपर्यंत रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत दरमहा 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे,' असे गायकवाड म्हणाले.

सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार -
काँग्रेसमधील आपसातील गटबाजीबाबत विचारले असता, 'काँग्रेस सर्व एक आहे, सर्वांना एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, मिलिंद देवरा, प्रिया दत्त हे सर्व आमचेच आहेत. त्यांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढवणार' असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Intro:मुंबई - शिवसेनेच्या काही गोष्टी भाजपाला माहीत होत्या. त्यामुळे शिवसेना दबावाखाली होती. या दाबावाखाली त्यांना कितीही कमी जागा दिल्या असत्या तरी त्यांनी लढवल्या असत्या असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी लगावला आहे. Body:घाटकोपर पूर्व येथील काँग्रेस उमेदवार मनीषा सूर्यवंशी यांच्या प्रचार कार्यालयाचे आज एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यानंतर "ई टीव्ही भारत" शी बोलत होते. यावेळी बोलताना निवडणुकीचे चित्र स्पष्टच होते. भाजपाला सोडून शिवसेना जाऊ शकत नाही. त्यांच्या काही गोष्टी बिजेपीला माहीत असतील म्हणून साहजिकच शिवसेनेवर दबाव होता. या दबावाखाली त्यांनी 124 काय 80 जागा दिल्या असत्या तरी त्यांनी लढवल्या असत्या असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी व त्यांचे इतर पक्ष सेक्युलर पक्ष आहेत. आम्हाला देशात लोकशाही टिकवायची आहे. देशाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. एकत्र कार्यक्रम व एकत्र जाहीरनामा घेवुन लढत आहोत. आमच्या शपथनाम्यात जी आश्वासने दिली आहेत त्यांना आम्ही बांधील आहोत. बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे तसेच जो पर्यंत रोजगार मिळणार नाही तो पर्यंत दरमहा 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे असे गायकवाड म्हणाले.

सर्वाना एकत्र घेऊन निवडणूक लढवणार -
काँग्रेसमधील आपसातील गटबाजीबाबत विचारले असता काँग्रेस सर्व एक आहे, सर्वाना एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, उर्मिला मातोंडकर, संजय निरुपम, मिलिंद देवरा, प्रिया दत्त हे सर्व आमचेच आहेत. त्यांना एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.