ETV Bharat / state

CM Eknath Shinde: खराब वातावरणाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला; जळगाव दौराच करावा लागला रद्द - Jamner Jalgaon tour

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कालिना एअरपोर्टच्या गेट क्रमांक सहावर आले. तिथून त्यांचा ताफा वर्षा निवासस्थानी परतला.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jan 30, 2023, 4:41 PM IST

मुंबई : राजकारणात एकमेकाचा विरोध होत असतो. वरचढ होऊ नये म्हणून अनेक मार्गाने अडथळा आणण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मात्र उलट आहे. येथे विरोधक नव्हे तर कधी चक्क शासकीय विमान आणि हवामान खोडा घालत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात सलग दुसऱ्यांदा खराब विमान आणि हवामनामुळे मुख्यमंत्र्यांचा प्रवास रखडला आहे. आज तर जळगाव दौरा हवामान खराब झाल्याने विमानच उतरले नाही त्यामुळे रद्द करावा लागला आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जामनेर दौरा : जळगावच्या जामनेरमधील गोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाने महाकुंभ अभियान आयोजित केला होता. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर दौऱ्यावर येणार होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बंजारा समाजाच्या संताच्या मंदिराचे उद्घाटनही केले जाणार होते. मात्र खराब हवामान असल्याने विमानाला परत माघारी यावे लागले.

शिंदे, फडणवीस या दौऱ्याला जाणार का : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे शासकीय विमानाने जामनेरला निघाले. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर हे विमान परत आणण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मोठा खोळंबा झाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कालिना एअरपोर्टच्या गेट क्रमांक सहावरून वर्षा निवासस्थानी निघाले. त्यामुळे शिंदे, फडणवीस या दौऱ्याला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विमानात तांत्रिक बिघाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला औरंगाबाद आणि पुण्याच्या दौऱ्यावर जाणार होते. त्यावेळीसुद्धा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने शिंदे आणि फडणवीस या दोघांनाही एअरपोर्टच्या व्हीआयपी वेटींग रुममध्ये थांबावे लागले होते. जवळपास एक तासाहून अधिक वेळ त्यांना ताटकळत राहावे लागले. एवढेच नव्हे तर दुरुस्तीसाठी विमानाला अधिक वेळ लागणार होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी यानंतर आपला ठाणे मतदारसंघ गाठला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रस्ते मार्गाने पुण्यात कार्यक्रमाला पोहचले होते. विमानामुळे प्रवास टाळण्याची दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवली आहे.

औरंगाबाद दौरा रद्द करावा लागला: दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या विमानाचे खरेदी करण्यात आली आहे. तेव्हापासून मुख्यमंत्री असो किंवा राजकीय महत्त्वाचे नेते, व्यक्तींसाठी हे विमान वापरले जात आहे. याच विमानामुळे मुख्यमंत्र्यांना औरंगाबाद दौरा रद्द करावा लागला होता. आता, खराब वातावरणाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला बसला आहे.तर मागच्या महिन्याभरात ही दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: CM Eknath Shinde मुख्यमंत्र्यांनी बोलावली सह्याद्रीवर आज सर्वपक्षीय खासदारांची बैठक होणार संसदीय अधिवशेनावर चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.