मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश, शिवसेना व ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे त्या सर्वांना दिशादर्शक देणारा आहेत. प्रतोद, व्हीप आणि राजकीय पक्षाची भूमिका यावर सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्ट शिवसेना व ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला असल्याचे दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
नैतिकता जिवंत असेल तर राजीनामा द्या: महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी नैतिक भूमिका म्हणून तत्कालीन परिस्थितीत आपल्या मुलीच्या गुणवत्ता वाढीवरून झालेल्या आरोपावरून राजीनामा दिला होता. तशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस यांनी ज्या प्रकारे सरकार स्थापनेसाठी पद्धत वापरली ती पूर्ण अयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जर नैतिकता अजून जिवंत असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
राज्यपालांच्या भूमिकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह: दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर सुरू झालेल्या सत्तासंघर्षावर आज निर्णय दिला आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी वापरलेल्या पद्धतीला न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहेत. तसेच राज्यपालांच्या भूमिकेवरसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचे दानवे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी काढला नैतिकतेचा मुद्दा: उद्धव ठाकरे म्हणाले, की राज्यपालांनी शिंदे फडणवीस सरकार स्थापनेकरिता संपूर्णपणे घटनाबाह्य केले. राज्यपालांच्या अधिकाराखील नसलेले निर्णय घेतल्याचे न्यायालयाने नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आले असते, असे सर्वोच्च न्यायलयाने सुनावणीत म्हटले. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केल्याचे म्हटले. ते म्हणाले, की, कायद्याच्या बाबतीत योग्य किंवा अयोग्य न विचार करता नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा दिला आहे. सर्व देऊनही मला विश्वासघात केल्याने पटले नव्हते. न्यायालयाने सत्यासाठी हपापलेल्या लोकांचे आज धिंडवडे काढले राज्यपालांच्या बाबतीत तर वस्त्रहरण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचा:
- Rahul Narvekar On SC Verdict : शिवसेनेचे प्रतिनिधित्व कोण करते हे तपासण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करू- राहुल नार्वेकर
- Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाने शिंदे, फडणवीसांना शिकवला नैतिकतेचा धडा; सरकारनेही दिले उत्तर, 'नैतिकता'चे राजकारण शिगेला
- CM DCM on SC Verdict : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; आम्ही समाधानी, नैतिकता आम्हाला शिकवू नका