ETV Bharat / state

Advice To MLAs : अजित पवार गटाशी जुळवून घ्या... शिंदे - फडवणीस यांचा आमदारांना कानमंत्र - Align with Ajit Pawar group

शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, नव्याने समाविष्ट झालेला अजित पवारांचा गट नंतर लागोलाग त्यांच्या ९ आमदारांना दिलेली मंत्रीपदाची शपथ. यासर्व घटनांनी शिंदे व भाजप च्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. व ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केले जात आहेत. तुम्हाला अजित पवार गटाशी जुळवून घ्यावेच लागेल असा कानमंत्र शिंदे व फडणवीस या दोघांनी आमदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. (Advice To MLAs)

Shinde Fadnavis advice to MLAs
शिंदे फडवणीस यांचा आमदारांना कानमंत्र
author img

By

Published : Jul 14, 2023, 3:45 PM IST

Updated : Jul 14, 2023, 4:13 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी करत ४० आमदारांसह बाहेर पडून भाजपला साथ दिली व राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या सरकारला एक वर्ष झाले तरी शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. हा विस्तार लवकरच होईल या आशेवर दोन्हीकडचे मंत्रिपदासाठी इच्छूक आमदार अपेक्षा ठेऊन होते.
मात्र अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट अचानक सत्तेत सामील झाला.

पवार गटाच्या 9 जणांना शपथ : अजित पवार फक्त सत्तेत सामील होऊन थांबले नाहीत तर त्यांच्यासोबत ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यातही ते यशस्वी झाले. त्यामुळे शिंदे गट तसेच भाजपातील आमदार नाराज झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तसेच राज्यात शिंदे - फडणवीस सरकार तसे स्थिर होते, ज्या अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्षभर आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला. त्यांना सत्तेत समाविष्ट करण्याचं नेमकं कारण काय? अशा प्रश्नांचा भडिमार सध्या दोन्ही कडच्या आमदारांकडून सुरू झाला आहे.

पवार गटाशी जुळवून घ्या : अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू मजबूत झाल्याचा दावा शिंदे - फडणवीस गटाचे काही आमदार खाजगीत करत आहेत. उद्धव ठाकरे हे अजित पवार यांच्यासोबत गेले, अजित पवार मविआ मध्ये आपल्या मतदार संघात निधी देत नव्हते, म्हणून आपण सत्तेतून बाहेर पडलो व आता पुन्हा त्याच अजित पवारांचं जर सत्तेत स्वागत करत त्यांना अर्थ खाते दिले जात असेल आपल्या बंडाचा काय उपयोग हा प्रश्न शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याकडे उपस्थित केल्याची माहिती सूत्र देत आहेत. परंतु आमदारांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दोन्हीकडच्या आमदारांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवारांना सत्तेत घेण्याचा निर्णय हा केंद्रातून झाल्याने त्याच्यावर जास्त भाष्य न करता सध्याच्या घडीला अजित पवार गटाशी जुळवून घ्या, असेही सांगण्यात आले आहे.

आमदारांना डिवचण्याचे प्रयत्न : १७ जुलै पासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने सरकारचे खाते वाटप लवकरच जाहीर झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवारांच्या सत्तेतील सहभागाने राज्यातील राजकारण ढवळले आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांकडून शिंदे तसेच अजित पवार गटातील आमदारांना डिवचण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतील. भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असून ती नाराजी शांत करण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस करत आहेत. मात्र तरीसुद्धा येणाऱ्या दिवसात अनेक बंडखोर आमदारांची घर वापसी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis: १६ आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस, २ आठवड्यांचा दिला वेळ
  2. Maharashtra Political Crisis: राजकारणासाठी फडणवीस पोहरादेवीला खोटे पाडत आहेत, संजय राऊतांचा आरोप
  3. Shasan Aapya Dari : लाभार्थ्यांचा प्रतिसाद नाही, शासन आपल्या दारीच्या गर्दी साठी यंत्रणेची तारांबळ

Last Updated : Jul 14, 2023, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.