ETV Bharat / state

अभिनेत्री शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप

शर्लिन चोप्राने एक ट्विट केले आहे. यात तिने म्हणलं आहे की, 'माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी मी एप्रिल २०१५ मध्ये साजिदची भेट घेतली. या भेटीदरम्यान साजिदने माझ्याशी लज्जास्पद कृत्य केले.'

Sherlyn Chopra Accuses Sajid Khan of Sexual Harassment
शर्लिन चोप्राचा साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप
author img

By

Published : Jan 20, 2021, 9:21 AM IST

Updated : Jan 20, 2021, 9:29 AM IST

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट निर्माते साजिद खान यांच्यावर आणखी एक आरोप झाला आहे. हा आरोप बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने केला आहे. साजिदने ६ वर्षापूर्वी भेटीदरम्यान केलेल्या कृत्याचे कथन शर्लिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यात तिने साजिदने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

शर्लिनचे ट्वीट

शर्लिन चोप्राने एक ट्विट केले आहे. यात तिने म्हणलं आहे की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी मी एप्रिल २०१५ मध्ये साजिदची भेट घेतली. या भेटीदरम्यान साजिदने तिच्याशी गैरकृत्य केले, असे शर्लिनचे म्हणणे आहे.

Sherlyn Chopra Accuses Sajid Khan of Sexual Harassment
शर्लिन चोप्राने केलेले ट्विट....

यापुर्वीही झालेत लैंगिक शोषणाचे आरोप

दरम्यान, याआधी बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिची बहिण करिश्मा हिने देखील साजिद खान यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. रिहर्सलदरम्यान जिया स्क्रिप्ट वाचत होती. तेव्हा साजिदने तिला टॉप काढण्यास सांगितले असल्याचा आरोप तिने केला होता. त्यावेळी तिला काय करावे हे समजले नाही. तेव्हा तिने सांगितले की, अजून चित्रपटाची शुटिंग सुरू झालेली नाही आणि हे सर्व काय सुरू आहे. यानंतर ती घरी येऊन रडू लागली. २०१८ मध्ये जेव्हा मी टू कॅम्पेनला सुरूवात झाली. यात साजिद खान यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले होते.

हेही वाचा - ‘बॅरिस्टर बाबू’ च्या सेटवरील जिवाभावाच्या मैत्रिणी, चाहत तेवानी आणि औरा भटनागर

हेही वाचा - ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या ‘मोशन कॅप्चर’ला सुरुवात, ओम राऊतने शेअर केला फोटो

Last Updated : Jan 20, 2021, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.