मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर (MP Shrikant Shinde on CM Chair photo) बसलेला फोटो ट्विट केला. यानंतर आता शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे ( Sheetal Mhatre Tweet Controversy) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट (Supriya Sule morf photo) केला. त्यामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे (NCP Aaditi Nalavade on Sheetal Mhatre) यांनी शीतल म्हात्रे यांच्या विरोधात फोटो मॉर्फ करून ट्विट केल्याचा आरोप (complaint against Sheetal Mhatre) करत तक्रार दाखल केली आहे.
सीएम पदाच्या फोटोवरून ट्विटवार - शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत असं ट्विट केले. यानंतर वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत, असा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता आणि श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विटही केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला.