मुंबई - मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात दावा केला होता. मुंबईतील एका वकिलाने शीना बोराला गोवाहाटीत इथे पाहिले आहे. या दिवसाचे गोवाहाटी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्याची निर्देश सीबीआयला देण्यात यावे असा अर्ज केला होता. या अर्जावर आज न्यायालयाने सीबीआयला सीसीटीव्ही मागवण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यात तथ्य नाही - इंद्राणी मुखर्जीच्या अर्जावर आज सीबीआयने उत्तर दाखल केले की इंद्राणी मुखर्जीने केलेला अर्ज यामध्ये काही तथ्य नाही. शीना बोराचा मृत्यू झाला असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीने केला होता. या दाव्यात कुठल्याही तथ्य नसल्याचे सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटल होत. इंद्राणी मुखर्जीवर आपली मुलगी शीना बोराचा 24 एप्रिल 2012 रोजी खून केल्याचा आरोप आहे.
शीना बोरा जिवंत असल्याचा दावा - यापूर्वी इंद्राणी मुखर्जी यांनी न्यायालयाला सांगितले होते की, शीना बोरा जिवंत आहे. कारण एका पोलीस महिलेने सांगितले होते की, तिने शीना बोराला 2021 मध्ये श्रीनगरमध्ये पाहिले होते. इंद्राणी मुखर्जीविरुद्ध खटला सुरू आहे. आतापर्यंत 69 साक्षीदारांनी जबाब नोंदवला आहे. इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांचे वकील रणजीत सांगळे यांच्यामार्फत विशेष न्यायालयासमोर याचिका दाखल केली. गुवाहाटी विमानतळावर विमानात चढत असताना मुंबईतील एका वकिलाने शीना बोरा सारखी दिसणारी महिला पाहिली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शीना बोरा गुवाहटी विमातळावर? विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जतन करून न्यायालयासमोर हजर करण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच मुखर्जी विमानतळ प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रात वकिलाने न्यायालयाला सांगितले की, वकिलासोबत असलेल्या व्यक्तीने विमानतळावर बोरासारखी दिसणाऱ्या महिलेचा व्हिडिओही काढला होता. विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांनी सीबीआयला या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यामध्ये इंद्राणी मुखर्जीने केलेला दावा काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. 2021 मध्ये एका याचिकेत मुखर्जी यांनी सीबीआयला सांगितले होते की, भायखळा तुरुंगात असलेल्या एका पोलीस महिलेने तिला सांगितले होते की, जून, जुलैमध्ये श्रीनगरमध्ये सुट्टीवर असताना तिने बोराला पाहिले होते.
न्यायालयाची दिशाभूल - उत्तरात सीबीआयने म्हटले होते की, मुखर्जी यांचा दावा काल्पनिक होता. त्या न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी कथा रचत होत्या. गेल्या वर्षी मुखर्जी यांच्या वकिलाने खटला चालवण्यात अडथळा होऊ नये असे सांगून याचिका स्थगित ठेवण्यासाठी अर्ज केला होता. यावर सीबीआयने हरकत घेतली होती.
काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम पतीपासून तिला मुलगी झाली होती. तिचं नाव शीना बोरा होतं. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा, शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी, पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
इंद्राणी मुखर्जी तुरुगांत - तसेच शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.