मुंबई - दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांची भूमिका असलेला शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी, म्हणजेच ४ सप्टेंबरला चित्रपट रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे. असे झाल्यास चाहत्यांना त्यांच्या लाडक्या कलाकराची आखेरची कलाकृती डोळे भरून पाहता येईल.
हेही वाचा - कंगना राणावतच्या ‘थलैवी’ मधील ‘एम जी रामचंद्रन’ चा लूक झाला रिलीज!
या चित्रपटाचे चित्रीकरण अजून शिल्लक आहे. आणि प्रदर्शनाची डेडलाईन पाळण्यासाठी निर्मात्यांनी परेश रावल यांना साद घातली आहे. ते उरलेले शुटिंग पूर्ण करणार असून प्रेक्षकांना एकाच रोलमध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल दिसतील. हे एक संवेदनशील पाऊल आहे, जे हिंदी चित्रपटात अभूतपूर्व आहे. एका ६० वर्षीय व्यक्तीच्या ‘वयात’ येण्याची ही गोष्ट असून, ती विनोदी पद्धतीने मांडण्यात आली आहे. यातून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे टॅलेंट व त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान याला सलामी दिली जाणार आहे.
‘शर्माजी नमकीन’ची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी मॅकगुफिन पिक्चर्सच्या सहकार्याने केली असून, दिग्दर्शनाची धुरा हितेश भाटिया यांनी वाहिली आहे. जे दिग्दर्शनातून पदार्पण करीत आहेत. ऋषी कपूर यांच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित करणे ही बाब त्यांना श्रद्धांजली असेल.
हेही वाचा - स्त्रीप्रधान ‘त्रिभंग’ बद्दल काजोल म्हणते, ‘हा चित्रपट स्त्रीत्व आणि मातृत्व साजरे करतो’!