ETV Bharat / state

Share Market Opening : मुंबई शेअर बाजार 4 दिवसांच्या पडझडीनंतर आज तेजीत; काय आहे सध्याची स्थिती, वाचा सविस्तर - जागतिक बाजार

Share Market Opening : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बाजार तेजीसह उघडला. आज शेअर बाजार दोलायमान परिस्थित दिसतो. BSE सेन्सेक्स 166 अंकांच्या उसळी घेत 64,571 वर उघडला. तर त्याचवेळी NSE निफ्टी 0.23 टक्क्यांनी वाढून 19,278 वर उघडलाय.

Share Market Opening
Share Market Opening
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2023, 11:09 AM IST

मुंबई Share Market Opening : देशांतर्गत मुंबई शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. BSE सेन्सेक्स 166 अंकांच्या उसळीसह 64,571 वर उघडला. तर त्याच वेळी NSE निफ्टी 0.23 टक्क्यांनी वाढून 19,278 वर पोहोचला. ल्युपिन, पीएनबी हाउसिंग, एनडीटीव्ही आजच्या व्यवसायात केंद्रस्थानी राहतील. प्री-ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निफ्टी फ्लॅट लाइनवर दिसला.

सोमवारी झाली होती घसरण : सोमवारी शेअर बाजारात प्रचंड घसरण दिसून आली होती. BSE सेन्सेक्स 875 अंकांच्या प्रचंड घसरणीसह 64,571 वर बंद झाला होता. त्याच वेळी NSE निफ्टी 1.35 टक्क्यांनी घसरून 19,278 वर बंद झाला होता. बजाज फायनान्स, एम अँड एम, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल यांचा सोमवारच्या बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत समावेश होता. त्याच वेळी एलटीआईमाइंडट्री, अडाणी एंटरप्राइजेज, हिंडाल्को इंडस्ट्रीज अडाणी पोर्ट्स यांचे व्यवहार घसरल्याचं पहायला मिळालं होतं.

वेदांताच्या शेअर्समध्ये होऊ शकते वाढ : वेदांताच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) सोनल श्रीवास्तव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या कंपनीतील ती तीन वर्षात पदावरून पायउतार होणारी तिसरी अधिकारी ठरली आहे. अजय गोयल, जे सध्या एडटेक स्टार्टअप बायजूचे सीएफओ आहेत. ते 30 ऑक्टोबरपासून वेदांतचे सीएफओ म्हणून परत येणार आहेत. त्यामुळं आजच्या व्यवसायात वेदांताच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

जागतिक बाजाराची स्थिती काय ? : जागतिक बाजारात आज काहीशी सुधारणा दिसून येत आहे. बुधवारी अमेरिकेचे मार्केट तेजीत होते. डाऊ जोन्स सरासरी 0.62 टक्क्यांनी वाढला होता. तर NASDAQ कंपोझिट इंडेक्समध्ये 0.93 टक्के आणि S&P 500 मध्ये 0.73 टक्के रिकव्हरी झाली होती. आजच्या व्यवहारात आशियाई बाजारातही तेजी असल्याचं पहायला मिळालंय. जपानचा निक्केई 1.30 टक्क्यांनी तेजीत आहे. तर हाँगकाँगचा हँग सेंग 2.60 टक्क्यांनी वधारलाय.

हेही वाचा :

  1. BSE Sensex Today: मुंबई शेअर बाजारासह निफ्टीनं गाठला विक्रमी निर्देशांक, शेअर बाजारात तेजीची लाट
  2. Share Market Update : शेअर बाजारात सेन्सेक्स 64 हजाराच्या पार, तर निफ्टी 19,108 अंकांवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.