ETV Bharat / state

'स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षबद्दल केले'

author img

By

Published : Sep 15, 2019, 11:37 PM IST

नुकताच नवी मुंबईत शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील तर, लोकच त्यांचा समाचार घेतील. १९८५ च्या निवडणुकीत सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. दिग्गज नेते बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहात पुढे येत आहेत.

शरद पवार

मुंबई - नुकतंच हातावरच घड्याळ बाजूला काढत भाजपचे कमळ हाती घेतलेले साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार यांनी नाव न घेता सडकून टीका केली आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षबदल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, जे राष्ट्रवादी सोडून गेलेत त्यांच्या जाण्याने पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

pawar
शरद पवार

हेही वाचा - बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? - मुख्यमंत्री

नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या भाजप पक्षांतरानंतर राष्ट्रवादीची सत्ता मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी नवी मुंबईत जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. नुकताच नवी मुंबईत शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील तर, लोकच त्यांचा समाचार घेतील. १९८५ च्या निवडणुकीत सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. दिग्गज नेते बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढ्याच उत्साहात पुढे येत आहेत. यानिमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल.

हेही वाचा - बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ, पक्ष पडझडीच्या काळात पवारच मैदानात

देशात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही पवार यांनी केली. शरद पवार कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे आदी हजर होते. त्या

Intro:नवी मुंबई

नुकतंच हातावरच घड्याळ बाजूला काढत भाजपचं कमळ हाती घेतलेले साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावर शरद पवार यांनी नाव न घेता सडकून टीका केलीये. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षबद्दल करीत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट उदयनराजे भोसले यांना टार्गेट केलंय. तसंच जे जे राष्ट्रवादीला सोडून गेले आहेत, त्यांच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडणार नसल्याचं ही यावेळी राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय.Body:नवी मुंबईत गणेश नाईक आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पक्षांतरावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी खरपूस टीका केलीये. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या भाजप पक्षांतरानंतर राष्ट्रवादीची सत्ता मजबूत करण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेत्यांनी नवी मुंबईत जातीनं लक्ष घालायला सुरवात केलीये. नुकतंच नवी मुंबईत शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्या गणेश नाईक आणि उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आलेले पळपुटेपणाची भूमिका घेत असतील, तर लोकच त्यांचा समाचार घेतील. त्याप्रमाणे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांनी पक्षांतर केलं आहे. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला कसलाच फरक पडणार नाही. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा सहाचे साठ आमदार करून दाखविले होते. दिग्गज नेते बाहेर पडत असले तरी तरुण कार्यकर्ते तेवढय़ाच उत्साहात पुढे येत आहेत. यानिमित्ताने तरुणांना अधिक संधी देता येईल, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षात बसून जास्त कामे करता येत असल्याचे सांगत देशात महागाई, बेरोजगारीसारखे अनेक प्रश्न निर्माण झाले असून सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले असल्याची टीका पवार यांनी केली.Conclusion:शरद पवार कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत नाही. या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे ही सर्व मंडळी या कार्यकर्ता मेळाव्यात हजर होते. त्यामुळे गणेश नाईक यांनी सोबत 48 नगरसेवकांच्या साथीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश नाईक विरुद्ध राष्ट्रवाद असा नवी मुंबईत सत्तासंघर्ष होणार हे मात्र नक्की.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.