ETV Bharat / state

Sharad Pawar Reaction On Karnataka : कर्नाटकात भाजपला मतदारांनी धडा शिकवला - शरद पवार - राज्यांमधील सत्तेचा गैरवापर भाजपने केला

कर्नाटकात भाजपचा पराभव करुन जनतेने भाजपला पक्षाला धडा शिकवल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हे चित्र दिसून येईल असे पवार म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By

Published : May 13, 2023, 2:19 PM IST

Updated : May 13, 2023, 4:18 PM IST

मुंबई : कर्नाटकात भाजपला जनतेने धडा शिकवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीतून आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र दिसत असल्याचे सूचक वक्तव्यही पवार यांनी केले. कर्नाटकचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील निकालावरुन ही बाब अधोरेखित झाल्याचेही पवार यांनी सांगितले.

पवारांनी केले काँग्रेसचे अभिनंदन : कर्नाटकात काँग्रेसला आलेल्या यशाबद्दल शरद पवार यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसने कर्नाटकात चांगली कामगिरी केली आहे. भाजपचा पराभव करताना मोठ्या संख्येने काँग्रेसचे आमदार निवडून येत आहेत. राज्यात भाजपपेक्षा दुप्पट उमेदवार काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्याबद्दल समाधान असल्याचे पवार यांनी सांगितले. लोकांना खोक्यांचे राजकारण पसंत नाही असा टोलाही पवारांनी लावला. महाराष्ट्रातील राजकारणात खोक्यांचा उल्लेख शिवसेनेने सोडून गेलेल्या आमदारांच्या संदर्भात केला होता. त्याचाच संदर्भ घेत अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्यांचे जास्तकाळ चालत नाही हेच यातून स्पष्ट होते असे पवार म्हणाले. या गोष्टी मुख्यतः लोकांना आवडत नाहीत. असे राजकारण लोकांना पसंत नसते. निकालावरुन हेच दिसत असल्याचे पवार म्हणाले.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर : केंद्रातील तसेच राज्यांमधील सत्तेचा गैरवापर भाजपने केला. मात्र जनतेच्या मनातही या सत्तेच्या गैरवापराविरोधात चीड होती. त्याचे प्रतिबिंब मतदानामध्ये दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बदनामीसाठी सीमावाद उकरुन काढल्याचा आरोपही पवार यानी केला. कर्नाटकचे चित्र संपूर्ण देशभर दिसेल असा आपल्याला विश्वास असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे मोदी है तो मुमकिन है हे समिकरण आता लोकानी नाकारल्याचेच या निकालातून दिसते असे पवार म्हणाले.

मोदींचा करिश्मा कमी : आतापर्यंत मोदींच्या नावाने भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढल्या तसेच त्या जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र ते यापुढे चालणार नाही असेच कर्नाटकातील निकालावरुन दिसते. मोदींचा करिश्मा कमी झाल्याचेच हे प्रतिक आहे. कर्नाटकमध्ये जे झाले तेच देशभर होईल कारण धर्माच्या आडून राजकारण केलेले लोकांना आवडत नाही. कर्नाटकात बजरंग बलीची घोषणा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. मात्र तिथे तशा घोषणा देण्यात आल्या. राजकीय स्वार्थापोटी हा खटाटोप करण्यात आला. लोकांनी हे ओळखले होते. त्यामुळे त्याला साथ मिळाली नाही असेही पवार म्हणाले.

भाजपचे राजकारण जनतेने झुगारले : कर्नाटकात प्रचाराच्या निमित्ताने मोदी आणि अमित शाह यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मात्र त्यातील बहुतांश ठिकाणी भाजपचा पराभव झाल्याचे दिसत आहे. भाजपने त्यांचा पराभव होणार हे दिसत असल्यानेच तेथे मोदी आणि शाह यांच्या सभा रद्द केल्या होत्या, असेच आता म्हणावे लागेल. तसेच जनतेला तेथील सरकार घोडेबाजार करुन पाडणे पसंत पडले नाही असेही पवार म्हणाले. भाजपचे पाडापाडीचे राजकारण जनतेने झुगारुन लावले आहे. भाजपपेक्षा दुप्पट जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. हे चांगले झाल्याचे पवार म्हणाले.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून सीमाप्रश्न उकरून महाराष्ट्राला बदनाम करण्यात येत होते. हेही जनतेला पसंत पडले नाही. महाराष्ट्रातील जनतेलाही बदनाम केले जात आहे. राज्यातील लोकांना बदल हवा आहे. जर राज्यात एकत्र लढल्यास नक्की यश येईल, असेही पवार म्हणाले.

  • हेही वाचा -
  1. Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात ८९ जागांचे निकाल जाहीर, काँग्रेस ५६ तर भाजपचा २६ ठिकाणी विजयी
  2. Karnataka election big fights : काँग्रेसचा 45 जागांवर विजय, मुख्यमंत्रीपदासाठी ठरवला फॉर्म्युला
  3. Shivsena criticizes BJP : चोर आणि लफंगे हीच सत्तेची गुरुकिल्ली, सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा समाचार

Last Updated : May 13, 2023, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.