ETV Bharat / state

वंचितकडे वळलेला वर्ग आपल्याकडे आणण्यासाठी प्रयत्न करा - शरद पवार

कधी काळी आपल्यासोबत असलेला समाजातील वंचित घटक पुन्हा आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवे. यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

author img

By

Published : Nov 3, 2019, 3:46 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी बैठक

मुंबई - कधी काळी आपल्यासोबत असलेला समाजातील वंचित घटक पुन्हा आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवे. यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची रविवारी प्रदेश कार्यालयात बैठक असून यात पराभूत उमेदवारांना शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार नवनिर्वाचित सातारचे खासदार श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित होते.

हेही वाचा - अजित पवारांनी वाचून दाखवला संजय राऊतांचा 'तो' मेसेज

मी इगतपुरीला गेलो, तिथली शेतकरी महिला म्हणाली मोदीला घालवले पाहिजे. याचा अर्थ वंचित समाजघटकाला बरोबर घेण्याची गरज आहे, त्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे. अल्पसंख्याक, मुस्लिम यांची शक्ती राष्ट्रवादीला मिळाली परंतू वंचित म्हणजे कोण? तर एक घटक वेगळा होऊन भाजपला फायदा व्हायचा प्रयत्न करतोय म्हणून तो बाहेर पडला. आता वंचितकडे वळालेला आंबेडकरी विचाराचा मतदार पुन्हा आपल्याकडे आला पाहीजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतल्यास राज्यात वेगळी स्थिती - नवाब मलिक

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असावा असे ते म्हणाले. विधानसभा निवडणूक झाली आणि निकाल अनपेक्षित लागला. दिल्ली आणि राज्यात त्यांची सत्ता असल्यानं त्यांनी फायदा घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही काँग्रेसच्या पक्षांनी एकत्र काम केलं असे पवार म्हणाले. पण ज्यावेळी आपल्याच पक्षातले लोक विरोधात काम करतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते. अशा पराभुत उमेदवारांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला पवार यांनी दिला.

हेही वाचा - 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शपथविधी शिवतीर्थावर'

अजित पवार म्हणाले, शरद पवार पुन्हा मराठवाडा दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहेत. ही बैठक संपल्यानंतर आम्हीदेखील दौऱ्यावर जाणार आहोत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे. त्याचीही तयारी करा, समोरच्यांनीही आता लवकर सरकार स्थापन करावे. आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती आपण पार पाडू असे ते म्हणाले. विलासराव देशमुख यांचाही पराभव झाला होता. जे सोडुन गेले त्यांना लखलाभ, यातही अनेक जण म्हणत होते जाऊ की थांबू ! आता गेलेलेही म्हणतात येऊ का, येऊ का ? जनतादेखील विचार करते हे यांनाच माहीत नाही तर, यांना का मदत करायची असे पवार म्हणाले.

हेही वाचा - घाटकोपर पूर्वमध्ये रसिकलाल ज्वेलर्सला टाळे, ग्राहकांची 300 कोटींची फसवणूक

छगन भुजबळ म्हणाले, अनेक लोक पक्ष सोडून गेले. मुख्यमंत्री म्हणायचे 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ' अशी पवारांची परिस्थिती झाली. मात्र, जनतेनीच त्यांना उत्तर दिले. सध्या 'कितने आदमी थे सांबा, साहब एकही था उसका नाम शरद पवार' असे शोलेमधले एक वाक्य व्हॉट्सअॅपवर फिरत आहे, असे म्हणत भुजबळांनी भाजपवर चिमटा काढला.

Intro:Body:mh_mum_ncp_lost candidates_meet1_mumbai_7204684

वंचितकडे वळलेल्या वर्ग आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवं : शरद पवार

मुंबई:कधी काळी आपल्यासोबत असलेला समाजातील वंचित घटक
पुन्हा आपल्याकडे कसा वळेल हे पाहायला हवं, यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

विधानसभा निवडनिकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांवर आज प्रदेश कार्यालयात बैठक असून पराभूत उमेदवारांना शरद पवार मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार नवनिर्वाचित सातारचे खासदार श्रीनिवास पाटील हे देखील उपस्थित होते.

मी इगतपुरीला गेलो, तिथले शेतकरी महिला म्हणाली मोदीला घालवले पाहिजे .याचा अर्थ वंचित समाजघटकाला बरोबर घेण्याची गरज आहे.त्यांच्या मनात सरकारबद्दल राग आहे. अल्पसंख्याक, मुस्लिम यांची शक्ती राष्ट्रवादीला मिळाली परंतू वंचित म्हणजे कोण तर एक घटक वेगळा होऊन भाजपला फायदा व्हायचा प्रयत्न करतोय म्हणुन तो बाहेर पडला . आता वंचितकडं वळालेला आंबेडकरी विचाराचा मतदार पुन्हा आपल्याकडं आला पाहीजे, असं ते म्हणाले.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असावा असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणूक झाली
निकाल अनपेक्षित लागला.दिल्ली आणि राज्यात त्यांची सत्ता असल्यानं त्यांची फायदा घ्यायचा प्रयत्न केला.
पण दोन्ही काँग्रेसच्या पक्षांनी एकत्र काम केलं असं पवार म्हणाले. पण ज्यावेळी आपल्याच पक्षातले लोक विरोधात काम करतो तेव्हा विचार करण्याची वेळ येते अशा पराभुत उमेदवारांना सांगत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
अजित पवार म्हणाले, शरद पवार पुन्हा मराठवाडा दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहेत.ही बैठक संपल्यानंतर आम्ही ही दौऱ्यावर जाणार आहोत.पदवीधर शिक्षक मतदार संघाची नोंदणी सुरू झाली आहे.त्याची ही तयारी करा समोरच्यांनी ही आता लवकर सरकार स्थापन करावे.आपल्या जी जबाबदारी दिली आहे ती आपण पार पाडू. विलासराव देशमुख यांचा ही पराभव झाला होता.जे सोडुन गेले त्यांना लखलाभ.यात ही अनेक जण म्हणत होते जाऊ की थांबू.जनता ही विचार करते याना च माहीत नाही तर यांना का मदत करायची.आता गेलेले ही म्हणतात येऊ का येऊ का ? असं अजित पवार म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले,अनेक लोक सोडून गेले.मुख्यमंत्री म्हणायचे पवारांची परिस्थिती अशी झालीय की आधे इधर जाओ आधे उधर जाओ.पण लोकांनी उत्तर दिलं.शोलेमधल्या डायलॉग व्हॉट्स अपवर फिरतोय।कितने आदमी थे सांबा, साहब एकही था उसका नाम शरद पवार
असं भुजबळ म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.