ETV Bharat / state

Sharad Pawar News : रिक्त जागांबाबत कायमस्वरुपी भरती करावी, कंत्राटी भरतीवरून शरद पवारांचा सरकारला सल्ला - शरद पवार कंत्राटी पोलीस भरती

कंत्राटी भरतीनं काम कसं होईल, हे माहीत नाही. कायदा व सुव्यवस्थेबाबत सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. ते वाय. बी. सेंटरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar News
Sharad Pawar News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 12:50 PM IST

Updated : Oct 13, 2023, 2:21 PM IST

मुंबई: राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. ५ महिन्यात १९ हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. याची राज्य सरकारनं गांभीर्यानं नोंद घ्यावी, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय बी सेंटरमध्ये पत्रकार परिषद यांनी व्यक्त केले. कंत्राटी पद्धतीनं होणाऱ्या पोलीस भरतीबाबतही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यातील अनेक सरकारी रुग्णालये आणि शिक्षणसंस्थांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, प्राथमिक शाळांमध्ये ३० हजार पदे रिक्त आहेत. शासकीय शाळा दत्तक देण्याला शिक्षक संघटनांकडून विरोधत होत आहे. दत्तक दिलेल्या शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. दत्तक घेतलेल्या शाळांना कंपन्यांना नाव देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबतही शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

  • NCP and Shiv Sena (UBT) have approached the Supreme Court to give directions to the Maharashtra Speaker to take a decision regarding the disqualification of some MLAs in a time-bound manner. SC can direct the Speaker to take a decision in time time-bound manner. We fear that… pic.twitter.com/aYLhNpLTYa

    — ANI (@ANI) October 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्य सरकारच्या दोन निर्णयावरून शरद पवारांची नाराजी-शरद पवार यांनी राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कंत्राटी पद्धतीने भरती यावरून राज्य सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार म्हणाले, यावर्षी १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान राज्यातून १९,५५३ महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांमध्ये ३ हजार कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. त्यावरूनही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी राज्य सरकारवर टीका केली.

काय आहे शाळांच्या खासगीकरणाचा निर्णय : महाराष्ट्र राज्य शिक्षक मुख्याध्यापक संघटनेचे नेते महेंद्र गणपुले यांनी शाळांच्या खासगीकरणावरून सरकार टीका केली. त्यांनी म्हटलंय की, राज्यातील 65000 सरकारी शाळा कंपन्यांना देण्याचा विचार हा खासगीकरणाचा आहे. सीएसआरमार्फत भौतिक सुविधा देणं सुरू असताना दत्तक घेणाऱ्या कंपनीचं नाव शाळेपुढे लावण्यात येणार आहे. त्यामुळं हा अत्यंत विचित्र खासगीकरणाचा प्रकार असूनन शिक्षण व्यवस्थेची वाट लागणार आहे.

काय आहे राज्य सरकारचा कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय - राज्य सरकारनं कंत्राटी पद्धतीने सरकारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांच्या अंतर्गत काम करणार्‍या सुरक्षा महामंडळातून ३ हजार कर्मचारी नियुक्त करण्याचा अध्यादेश काढला आहे. महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन (MSSC) या सरकारी उपक्रमातून काढलेले हे कर्मचारी करारानुसार ११ महिने काम करणार आहेत. त्यानंतर ११ महिन्यांच्या कालावधीत कंत्राटी तत्वावरील पोलीस हे मुंबई पोलिसांना निवडक कर्तव्यात मदत करणार आहेत.

हेही वाचा-

  1. Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीतील खलबतं चव्हाट्यावर; शरद पवारांचा राजीनामा स्टंटबाजी? जाणून घ्या, राजकीय विश्लेषकांचं मत
  2. Sharad Pawar On Police Bharti : कंत्राटी पोलीस भरतीला शरद पवारांचा विरोध; म्हणाले, महिलांना...

Last Updated : Oct 13, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.