मुंबई : Sharad Pawar On Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी छगन भुजबळ तुरुंगात होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांना मदत केली नव्हती, असा आरोप त्यांनी केला होता. याला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्रच समोर आणले आहे. त्यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या आरोग्याची काळजी व्यक्त केली होती. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारची जबाबदरी असून काहीही घडल्यास सरकार जबाबदार असेल, असा इशारा देखील पत्रातून दिला होता. यानंतर देखील छगन भुजबळ बोलत आहेत, याविषयी शरद पवारांनी खेद व्यक्त केला.
भुजबळांच्या प्रकृतीची चिंता करणारे पत्र: माझ्यासोबत काम करताना त्यांना मी हुकूमशहा असल्याचे जाणवलं नाही आणि मलासुद्धा जाणवले नाही. 20 ते 25 वर्षे छगन भुजबळांनी माझ्यासोबत, माझ्या हाताखाली काम केलं. त्या काळात त्यांना काहीही जाणवलं नाही. पक्ष स्थापनेच्या वेळी ते आपल्या सोबत होते. त्यांचा नेमका अडचणीचा काळ म्हणजे त्यांना जेलमध्ये जावं लागलं तो. का जावं लागलं याच्या खोलात मी जात नाही. 8 मार्च 2018 रोजीचे पत्र असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिले होते. पुस्तकात छगन भुजबळ यांचा राजकारणातील असलेल्या योगदानाची माहिती नमूद करण्यात आली आहे. छगन भुजबळ ओबीसी लिडर आहेत. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात याव्या अशी पत्रातून विनंती करण्यात आली होती. त्यांच्या तब्बेतीला काही झाले तर त्याला राज्य सरकार जबादार असेल असं पत्रात लिहिलं आहे. तरी भुजबळ म्हणताहेत की, मदत केली नाही असा उपरोधिक टोला शरद पवारांनी छगन भुजबळांना लगावला आहे.
त्यांना पर्याय योग्य वाटला: भाजपा सोबत लढण्यासाठी छगन भुजबळांना वारंवार पुढे केले जायचे आणि शरद पवार भाजपा सोबत चर्चा करायचे. याच शरद पवार यांच्या कार्यशैलीवर अजित पवार गट प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, अशी चर्चा करायचो असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. मात्र, मी भाजपासोबत गेलो नाही, तर भुजबळ गेले. ईडी, सीबीआय, इन्कॅम टॅक्स सारख्या संस्था माहिती नव्हत्या. आता लोकांना माहीत झाल्या आहेत. त्याची उपयुक्तता राजकीय नेत्यांना कळली आहे. त्याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी एजन्सीजची उपयुक्तता त्यांनी लक्षात घेतली. ह्या निर्णयासोबत हा वेगळा राजकीय पर्याय त्यांना योग्य वाटला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा: