ETV Bharat / state

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी शरद पवारांचा राहुल नार्वेकरांना सल्ला; म्हणाले 'प्रतिमा जपली पाहिजे'

Sharad Pawar Press : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील जागावाटप, बिल्किस बानो प्रकरणातील सर्वोच्च निकाल यासह विविध मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावरुनही शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सल्ला दिलाय.

Sharad Pawar press
Sharad Pawar press
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 1:01 PM IST

Updated : Jan 9, 2024, 4:39 PM IST

मुंबई Sharad Pawar Press : बिल्किस बानो प्रकरणातील निकालानं सामान्यांना आधार मिळालाय. न्यायालयाच्या निकालाचं स्वागत आहे. बिल्किस बानो प्रकरणाची पार्श्वभूमी गोध्राची आहे. सर्वोच्च न्यायालयानं निकाल राज्याकडं पाठविलं आहे. बिल्किस बानो प्रकरण राज्य सरकार गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राहुल नार्वेकरांना सल्ला : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर शंकेला वाव आहे. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकालानंतर प्रतिक्रिया देता येईल. तसंच विधानसभा अध्यक्षांनी प्रतिमा जपली पाहिजे,असा सल्ला शरद पवार यांनी राहुल नार्वेकर यांना दिलाय. अजित पवार हे वयावरून टीका करतात. यावर शरद पवार म्हणाले, "त्यांना योग्य वाटते ते बोलू शकतात. माझ्या कार्यक्षमतेबद्दल व काम करण्याच्या पद्धतीत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले नाहीत. मोरारजी देसाईदेखील वय जास्त होऊन काम करत होते.'

महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार निर्णय : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, 'दिल्तीत महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक होत आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहेत. राष्ट्रवादीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. तसंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, डाव्या पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित करावं' अशी मागणी करत, 'आगामी निवडणुकीबाबत एकत्र काम कसं करावं, याची बैठकीत चर्चा करण्यात येईल. जागावाटपाबाबत सर्वच पक्षांकडून जास्त जागांची मागणी असते. प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडणार आहे', असंही पवारांनी यावेळी सांगितलं.

काहीही झालं तरी एकत्र लढणार : जागावाटपात महाविकास आघाडीत काही फरक दिसत नाही. काहीही झालं तरी एकत्र लढावं लागणार आहे. चर्चेतून जागा वाटपाचा मार्ग काढणार आहोत. ५ ते ६ जागा आहेत, त्यावर चर्चा करणार आहोत, अशी प्रतिक्रियाही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. राम मंदिर मुद्द्यावरही यावेळी शरद पवार यांनी भाष्य केलं. राम मंदिरविरोधात आमच्या पक्षाकडून कोणतेही स्टेटमेंट करण्यात आलं नाही. राम श्रद्धेचे स्थान आहे. मला अयोध्येचं आमंत्रण आलेलं नाही. मला निमंत्रणाची आवश्यकताही नाही. जेव्हा जायचं तेव्हा मी जाईल, असंही पवार म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. त्याबाबत पवार म्हणाले, "दिल्लीतील सरकार बदलत नाही, तोपर्यंत धाडसत्र सुरुच राहणार आहे.'

पंतप्रधानांचा आम्ही सन्मानच करणार : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीप सरकारमधील मंत्र्यांनी आपत्तीजनक वक्तव्य केली आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींवरील अशा प्रकारचे विधानं आम्ही स्वीकारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्यात काही राजकीय मतभेद असू शकतात. आपल्या देशाचे पंतप्रधान जेव्हा बाहेर देशात जातात, परदेशातील सरकारमध्ये असलेले काही लोक पंतप्रधानांसंदर्भात वक्तव्य करतात, पंतप्रधानांच्या पदावर हल्ला करतात, त्यामुळं पंतप्रधानांच्या पदाचा अवमान होतो. पंतप्रधानांच्या पदाचा अनादर करणारे वक्तव्य आम्ही स्वीकारत नसून, पंतप्रधानांचा आम्ही सन्मानच करणार.'

होतं. तुमच्या एकजुटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.

हेही वाचा-

  1. बिल्किस बानो प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बिल्किस बानोंनी व्यक्त केल्या 'या' भावना
  2. बिल्किस बानोचा संघर्ष हा अहंकारी भाजपा सरकारविरोधातील न्यायाच्या विजयाचं प्रतीक - राहुल गांधी

Last Updated : Jan 9, 2024, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.