ETV Bharat / state

राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - उद्धव ठाकरे बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:55 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल (शनिवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी शरद पवार यांनी भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे ही बैठक चालली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत नक्की माहिती मिळू शकली नाही. मात्र, टाळेबंदी शिथिल करण्यासंबंधी आणि राज्यातील कोरोनाच्या स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही विषयांवर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो. आमच्या दोघांमध्ये वैचारिक मदभेद असू शकतात. मात्र, शत्रुत्व नाही. आम्ही बंकरमध्ये बसून नाही तर, खुल्या ठिकाणी बैठक घेतली, असे संजय राऊत स्पष्ट करत चर्चेला विराम दिला होता. फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलात बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, शिवसेना सरकार पाडण्याचा भाजपाचा कोणताही हेतू नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.

'ते माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच विरोधी पक्षनेते आणि बिहार निवडणुकीचे प्रभारी आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'साठी मुलाखत घेण्यासाठी आमची बैठक आधीपासूनच ठरली होती. मात्र, कोरोना आणि इतर कारणांमुळे मुलाखत होऊ शकली नव्हती. या बैठकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहिती होती. आम्ही बंकरमध्ये बसून नाही तर, खुल्या ठिकाणी बैठक घेतली, असे संजय राऊत म्हणाले.

मागील वर्षी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपा आणि शिवसेनेत दुरावा आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.