मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघात उत्साहात मतदान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी विद्यामंदीर, मुंबई (दक्षिण मुंबई मतदारसंघ) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईकरांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनीही सकाळी मतदान करणे पसंत केले. उत्तर मुंबई मतदारसंघाचे भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली पश्चिम येथील जे बी खोत हायस्कूलमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. वायव्य मतदारसंघात गोपाळ शेट्टी विरोधात उर्मिला मातोंडकर अशी लढत पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.
पाहा कोणी केले मतदान -
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनी पत्नी स्वरूप संपत यांच्यासह विले पार्लेच्या जामनाबाई शाळेत बूथ क्र. २५०-२५६ वर केले मतदान
अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
दक्षिण : अनिल अंबानी यांनी जी़डी स्वामानी शाळेतील बूथ नं. २१६ कपी परेड येथे केले मतदान
वायव्य मतदारसंघ - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुटुंबासहित बजावला मतदानाचा हक्क
उत्तर मुंबई - 7.85, वायव्य - 6.90 टक्के, ईशान्य - 7.00, उत्तर मध्य - 5.98, दक्षिण मध्य 6.45, दक्षिण मुंबई - 5.91