ETV Bharat / state

Sharad Pawar : शरद पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी कायम; पक्षात सुधाराची आवश्यकता - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील ३ दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट आज झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच कायम राहणार असल्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar
author img

By

Published : May 5, 2023, 8:59 PM IST

Updated : May 5, 2023, 10:50 PM IST

मुंबई : शरद पवारांच्या या निर्णयाने सर्वात जास्त आनंद हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना झाला असून पक्ष मजबुतीसाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. परंतु या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अनुपस्थितीने पक्षातील अंतर्गत कुरघोडी सुरू राहणार असल्याचेही अस्पष्ट संकेत दिसत आहेत.

पक्षाला बळकटी येणार : शरद पवारांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी भेटणार असली तरी सुद्धा पत्रकार परिषदेत अजित पवारांची अनुपस्थिती ही लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. शरद पवार अध्यक्षपदावर कायम नसतील तर अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जे कार्यकर्ते शरद पवारांच्या नावा रूपानेच पक्षात आजही कार्यरत आहेत त्यांच्यासाठी शरद पवारांचा अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय फारच धक्कादायक होता. जर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला नसता तर पक्षासाठी तो घातक ठरला असता, पक्ष फुटीच्या मार्गावर गेला असता, अशीही शक्यता मोठ्या प्रमाणात होती. म्हणूनच शरद पवारांच्या अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाने मोठा दिलासा हा पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटला आहे. शरद पवार अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना शरद पवारांच्या आजच्या निर्णयाने आनंद झाला असून देशभरातील कार्यकर्त्यांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं त्यांनी याप्रसंगी म्हटलं आहे.

अजित पवारांचे महत्त्व कमी होऊ देणार नाहीत : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मजबूत, ताकतवान पक्ष आहे. परंतु अजित पवार यांच्या बदलत्या भूमिकांमुळे सध्या हा पक्ष कुठल्याही क्षणी बिथरू शकतो अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातच शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास काय हरकत आहे? असा प्रश्न सर्वप्रथम अजित पवार यांनी उपस्थित केला. आज ते पत्रकार परिषदेत अनुपस्थित राहिल्याने त्यावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झाले. मागील महिन्याभरातील घडामोडी पाहिल्या तर अजित पवार, त्यांचे समर्थक कुठल्याही क्षणी भाजपमध्ये जाऊ शकतील अशी शक्यता वर्तवली जात होती. या शक्यतेला स्वतः अजित पवार यांनीच पूर्णविराम जरी दिला असला, तरी त्यांची वक्तव्य दिशाभूल करणारी, पक्षाला घातक ठरणारी आहेत.

अजित पवारांवर बारीक लक्ष : शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहून पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण करणाऱ्यावर एकाअर्थी बंदी घातली आहे. तरी अजित पवारांचा पूर्व इतिहास पाहता भाजपसोबत त्यांची असलेली जवळीक पाहता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर काकांचे अर्थात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचं बारीक लक्ष राहणार आहे. त्याचबरोबर पक्षातील प्रत्येक निर्णय घेताना अजित पवारांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे. अजित पवार हे पक्षातील महत्त्वाचे नेते असून त्यांची नाराजी ही पक्षासाठी घातक ठरू शकते. हे शरद पवार यांना चांगलं माहित आहे. म्हणूनच सध्याच्या घडीला पक्षातील अजित पवारांचे महत्त्व ते कमी करून भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाहीत.

सुप्रिया राष्ट्रीय स्तरावर तर रोहित कडे युवा नेतृत्व : शरद पवारांच्या या राजीनामा नाट्यामुळे दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यातील पहिली घटना म्हणजे सध्याच्या घडीला वारंवार बदलणाऱ्या अजित पवारांच्या भूमिकेमुळे पक्ष फुटीवर असताना त्यावर बंदी घालण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय स्तरावर झाली असल्याकारणामुळे शरद पवारानंतर पक्षात उत्तराधिकारी कोण असू शकत याचे संकेतही त्यांनी या घटनेतून दिले आहे. कारण शरद पवार यांनी स्वतःहून पक्षाला उत्तराधिकारी महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. त्यातच आज पत्रकार परिषदेसाठी येतांना सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानातून निघताना रोहित पवार हे शरद पवार यांच्या सोबत एकत्र आले. त्यातच मंचावर शरद पवारांबरोबर प्रफुल पटेल यांच्या सोबतीला रोहित पवारांची असलेली उपस्थिती येणाऱ्या भविष्यातील युवा नेतृत्वाचे संकेत असल्याचेही त्यांनी दाखवून दिलं आहे.

  • हेही वाचा -
  1. Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारच
  2. Ajit Pawar and Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेला गैरहजर; शरद पवार म्हणाले...
  3. Sharad Pawar Young Brigade : शरद पवारांची यंग टीम आली समोर; अजित पवार, सुप्रिया सुळे गायब

Last Updated : May 5, 2023, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.