मुंबई Sharad Pawar Criticized PM : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला आरक्षणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. महिला आरक्षणाबाबत मोदी जे बोलत आहेत ते चुकीचे आहे. महिला आरक्षणाबाबत यापूर्वी अनेक निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोदी चुकीचं बोलत आहेत : विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, विरोधकांनी महिला आरक्षणाला नाईलाजानं पाठिंबा दिला. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, महिला आरक्षणाचा निर्णय संसदेत एकमतानं घेण्यात आला. दोन सदस्य वगळता कोणीही विरोध केला नाही. घटनादुरुस्ती करताना ओबीसींनाही संधी द्यावी, अशी सूचना होती. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, काही लोकांनी नाईलजानं महिला आरक्षणाचं समर्थन केले, असं म्हणणं चुकीचं आहे. हे विधान क्लेशदायक आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, माझ्याकडे 1993 मध्ये महाराष्ट्राचे सूत्र होते. त्यावेळी आम्ही राज्य महिला आयोगाची स्थापना केली. शिवाय स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू करून महिला आरक्षणाचा निर्णय झाला.
महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण : महिला आरक्षणावर याआधीही चर्चा झाली आहे. महाराष्ट्रानं देशातील पहिलं महिला धोरण जाहीर केलं होतं. महिलांना शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. मी मुख्यमंत्री असताना हे निर्णय घेतले. तरीही पंतप्रधान म्हणतात, या देशात महिला आरक्षणाचा विचारही करण्यात आला नाही. संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलात महिला महिलांनाही आम्ही हवाई दलात घेतले. महिलांना संरक्षण मंत्री म्हणून नेमण्याचा प्रश्न मी उपस्थित केला, तेव्हा कोणीही त्यासाठी तयार नव्हतं. रोज सकाळी ९ वाजता संरक्षणमंत्र्यांची बैठक असते. त्यावेळी मी तिन्ही दलांमध्ये महिलांना घेण्याची कल्पना मांडली. त्यावेळी सर्वांनी नाही म्हटलं होतं. त्यावेळी 3 बैठका झाल्या, पण नाही सांगण्यात आलं. पण महिलांना संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय मी जाहीर केला. सर्वांना तो स्वीकारावा लागला. या सर्व गोष्टी काँग्रेस सत्तेत असताना झाल्या. दुर्दैवानं याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही सांगितलं नाही.
हेही वाचा -
- Raj Thackeray on Marathi Signboards : दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, राज ठाकरे म्हणाले, मूठभर व्यापाऱ्यांनी...
- Sanjay Raut On Pm Modi : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा पक्ष फुटलेला असेल, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
- Khalistani Shelter in Nanded : 'एनआयए'कडून गँगस्टर्सची यादी जाहीर; नांदेडात आश्रय घेण्याची शक्यता, पोलीस सतर्क