ETV Bharat / state

रावसाहेब दानवेंच्यातील 'ज्योतिषी' प्रतिभा मला आता समजली - शरद पवार

author img

By

Published : Nov 24, 2020, 4:43 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी दोन ते तीन महिन्यात भाजप महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल, असे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले.

शरद पवार
शरद पवार

मुंबई - रावसाहेब दानवे राजकारणात कधी 'ज्योतिषी' म्हणून ओळखले जात नव्हते. पण, आता मला माहीत झाले की त्यांच्यात ही प्रतिभादेखील आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी दोन ते तीन महिन्यात भाजप महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल, असे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील एका पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.

रावसाहेब पाटील-दानवे हे वर्षानुवर्षे खासदार आणि राजकारणी आहेत. पण, त्यांच्या या गुणवत्तेची मला कल्पना नव्हती. राजकारणात ते कधी 'ज्योतिषी' म्हणून ओळखले जात नव्हते. पण, आता मला माहीत झाले की त्यांच्यात ही प्रतिभादेखील आहे, असे मिश्कीलपणे शरद पवार म्हणाले.

भाजपची तयारी झाली

भाजप पुढील दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल. त्यासाठी आमची तयारी झाली आहे. मला असे वाटत नाही की, आपले सरकार स्थापन होणार नाही. दोन-तीन महिन्यांत हे सरकार स्थापन होईल. आम्ही केवळ विधान परिषदेच्या निवडणुका पार पाडण्याच्या प्रतीक्षेत आहोत, असे ते परभणीत पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमात म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.