मुंबई - भाजपने विविध मुद्यांच्या आधारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानेच त्यांना झारखंडच्या जनतेने नाकारले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्राच्या निकालापासून झारखंडला नवीन रस्ता मिळाल्याचे ते म्हणाले. भाजपने देशाची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे. दिवसेंदिवस मंदी वाढत असून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे पवार म्हणाले. तसेच झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारल्याबद्दल पवार यांनी अभिनंदन केले.
भाजपने समाजाच्या विविध घटकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. झारखंडमध्ये भाजपने आपली संपूर्ण ताकद लावली होती मात्र, तिथल्या जनतेने त्यांना नाकारले. भाजपविषयी जनतेच्या मनात प्रचंड नाराजी असून, झारखंडसारखी परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळेल, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
लोकशाहीच्या चौकटीत आंदोलन करा
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC च्या विरोधात आंदोलन करताना लोकांनी गांधी मार्गाने आंदोलन करावे. कोणत्याही सरकारी मालमत्तेचे नुकसान करु नये, लोकांना माझे आवाहन असल्याचे पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ, संसदेत NRC ला विरोध झाला नसल्याचे सांगितले, मात्र हे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार मुख्यमंत्र्यांना
मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत पवारांना प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. सरकार येऊन 15 दिवस झाले नाहीत. तोपर्यंत विरोधक टीका करत आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक झाली असे विरोधक म्हणत आहेत. हे विरोधकांचे म्हणणे अयोग्य असल्याचे पवार म्हणाले.

Intro:Body:
[12/23, 4:28 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: शरद पवार@
झारखंड मध्ये भाजप ला जनतेने सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला
झारखंड जनतेचे मी अभिनंदन करतो
आम्ही 5 जागा लढवल्या त्यात एक जागा जिंकली आहे
मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे
केंद्र सरकारने या देशाचे अर्थकारण योग्य दिशेने हाताळली नाही
सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे
नागरिकत्व प्रश्नांची फारशी आवश्यकता नव्हती
पंतप्रधान यांच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटते..
समाजामध्ये,विविध घटकांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे
2019 ला परलीमेंट्री अधिवेशन वेळी राष्ट्रपती अभिभाषणात NRC बाबत भूमिका मांडली होती
दोन्ही सभागृहात गृहमंत्र्यांचे भाषण हे झाले असतांना सभागृहात हे झाले नाही असे सांगितले जात आहे
देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यात भाजप अपयशी
झारखंड मध्ये राजकिय आर्थिक ताकद भाजप ने लावली मात्र ते अपयशी ठरले योग्य वेळेला लोक झारखंड निकाला प्रमाणे सगळीकडे निर्णय घेतील हा मला विश्वास आहे
[12/23, 4:33 PM] Sanjiv Bhagwat, Mumbai: शरद पवार #
NRC बाबत संसदेत चर्चा झाली त्यात समाजात वाद निर्माण होईल ही भूमिका आम्ही मांडली होती...
लोकांना माझे आवाहन आहे शांततेत NRC बाबत आपली भूमिका मांडा
पंतप्रधान यांनी मंत्रिमंडळ,संसदेत NRC बाबत विरोध झाला नाही असे सांगितले हे चुकीचे
लोकांनी लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष करणे योग्य
राजकीय शक्तीचा आधार घेऊन कोणी NRC बाबत उतरत असेल तर लोकांची विरोधाची तीव्रता वाढेल
सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नये
लोकांनी आपली नापसंती,राग व्यक्त करतांना शांततेत करावा...
महाराष्ट्राच्या निकाला पासून नवीन रस्ता झरखंडला मिळाला आणि बदल झाला
ज्या राज्यात भाजप ची सत्ता होती ती सत्ता आता लोकांना नको आहे
सर्वपक्षीय बैठका घेत राष्ट्रीय विषयांवर यापूर्वी चर्चा होत होती आता ते होत नाही
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे...
राष्ट्रवादीची यादी तयार आहे
सरकार येऊन 15 दिवस झाले नाही निर्णय घेऊन 2 दिवस झाले नाही अश्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे विरोधकांचे म्हणणं कितपत योग्य
Conclusion: