मुंबई Desai On Sanjay Raut : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकार जर ओबीसीतून मराठा आरक्षण (Maratha Reservation) देत असेल तर आमचा त्याला विरोध आहे. ओबीसी आरक्षण संपविण्याचा सरकारचा हा डाव आहे आणि असे जर झाले तर आरक्षण देणाऱ्यांना जनता सत्तेतून बाहेर फेकून देईल, असं ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं होतं. याला उत्तर देताना भुजबळ यांनी संभ्रम निर्माण होईल, असं वक्तव्य करु नये, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं. दरम्यान, याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटताना दिसले. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आरक्षणावर वक्तव्य करु नका, अशा सूचना दिल्या. मात्र बैठकीत मंत्र्यांमध्ये गॅगवार झाले, तसंच मंत्री ऐकमेकांच्या अंगावर धावून गेलं, असा दावा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याचा खुलासा करताना शंभूराज देसाई यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.
आपला तो बाब्या आणि... : आज मुंबईत मंत्री शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना, पुढे म्हणाले की, काल मंत्रिमंडळ बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याची चर्चा मुद्दाम पसरवली जातेय. जे बैठकीत झालंच नाही, ते झाले म्हणून सांगतायेत. बैठकीत मंत्र्यांमध्ये गॅगवार झाले, तसेच ऐकमेकांच्या अंगावर धावून गेले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, ते शंभर टक्के चुकीचं व खोटं आहे. त्यांना ही माहिती कोणी दिली माहित नाही, पण राउतांना त्यांचेच खबरी एक दिवस अडचणीत आणतील, राऊतांचं असं झालं आहे की, 'आपल्या तो बाब्या... आणि दुसऱ्यांचं ते कार्ट...' ही म्हण राऊतांना लागू होते. असा टोला देखील शंभूराज देसाई यांनी लगावला.
राऊतांचा गॅगवार हा शब्द हास्यास्पद : देसाई पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊतांना महाराष्ट्रात कोणी गांभीर्यानं घेत नाही, मंत्रिमंडळ बैठक खेळीमेळीची झाली. राऊतांकडे आम्ही गांभीर्यानं पाहत नाही. मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणावर वाद निर्माण होतील, असं वक्तव्य करु नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पण वाद किंवा गॅगवार झाले नाही. राऊत स्वत: व त्यांचा पक्ष सोडून ते सर्वांकडे सशंयाच्या नजरेन बघतात. विश्वज्ञानी संजय राऊत यांना त्यांचे खबरीच एक दिवस अडचणीत आणतील. संजय राऊत यांची मानसिकता पाहता, ते तपास यंत्रणा किंवा अन्य स्वायतत्ता संस्था यांच्यावर देखील त्यांचा विश्वास नाही. हे राज्य घटनेनं चालतं आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर बैठकीत चर्चा झाली. दिवाळीनंतर दिल्लीत जाऊन राज्य सरकार क्युरेटिव्ह पिटिशनबाबत कॉन्फरन्स घेणार आहे.
हेही वाचा -
- Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
- Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची चौकशी करा; शंभूराज देसाईंची मागणी, काय आहे प्रकरण?
- GramPanchayat Election : कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचा डंका, सातारा जावळीत भाजपाची तर पाटणमध्ये शिंदे गटाची घोडदौड