मुंबई - मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. याचा फटका रेल्वे वाहतुकीसह रस्तेवाहतुकीला बसला आहे. मुंबईतील अनेक जुन्या इमारतीना यामुळे धोका निर्माण झाला आहे. आज कुर्ला स्थानक परिसरात संसार हॉटेलसमोर असलेली इमारत कोसळी. शकिना मंजिल, असे इमारतीचे नाव आहे.
या इमारतीचे नाव मुंबई महापालिकेच्या धोकादायक इमारतीच्या यादीत असल्याचे समजते आहे. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.