ETV Bharat / state

राहुल गांधींना पराभवाची भीती असल्यानेच वायनाडमधून उमेदवारी - शाहनवाज हुसैन - राहुल गांधी

मोठे राजकीय नेते २ मतदार संघात निवडणूक लढवतात. मात्र, त्यामागे काही भूमिका असते. मात्र, राहुल गांधी यांना पराभवाची भिती वाटत असल्याने ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे हुसैन म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना शाहनवाज हुसैन
author img

By

Published : Apr 5, 2019, 1:20 PM IST

Updated : Apr 5, 2019, 2:31 PM IST

मुंबई - राहुल गांधी उत्तरप्रदेशातील अमेठी या पारंपरिक मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, या मतदारसंघात त्यांचा जनाधार आता पहिल्यासारखा राहिला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाची भीती असल्यानेच ते आता केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन केले आहे. गुरुवारी ते भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना शाहनवाज हुसैन

भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही पंतप्रधान मोदीच चालणार आहेत. या निवडणुकीत ७४ जागा भाजप जिंकेल, असा विश्वास हुसैन यांनी व्यक्त केला आहे. मोठे राजकीय नेते २ मतदार संघात निवडणूक लढवतात. मात्र, त्यामागे काही भूमिका असते. मात्र, राहुल गांधी यांना पराभवाची भिती वाटत असल्याने ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले.

शाहनवाज हुसैन मुंबई आणि मुंबई लगतच्या भिवंडी मतदार संघात प्रचार करणार आहेत. मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, शिवाजीनगर या मुस्लिम बहुल वस्तीत हुसैन यांच्या सभा होणार आहेत.

Intro:राहुल गांधी यांना पराभवाची भीती म्हणूनच ते वायनाड मधूनही लढत आहेत - शाहनवाज हुसैन

मुंबई ४

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळ मधील वायनाड लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर भाजपकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे . राहुल गांधी उत्तरप्रदेशातील अमेठी या पारंपारिक मतदार संघातूनही निवडणूक लढवत आहेत . मात्र या मतदार संघात त्यांचा जनाधार आता पहिल्या सारखा राहिला नाही .त्यामुळे त्यांना पराभवाची भीती असल्यानेच ते आता केरळ मधल्या वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत , असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे . भाजप प्रदेश कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते .

भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या . या निवडणुकीतही पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा चालणार असून या निवडणुकीत ७४ जागा भाजप जिंकेल असा विश्वास हुसैन यांनी व्यक्त केला आहे . मोठे राजकीय नेते दोन मतदार संघात निवडणूक लढवतात ,पण त्या मागे काही भूमिका असते ,पण राहुल गांधी यांना केवळ वाटणारी भीतीच असल्याचे त्यांनी सांगितले .

शाहनवाज हुसैन मुंबई आणि मुंबई लगतच्या भिवंडी मतदार संघात प्रचार करणार आहेत . मुंबईतील कुर्ला ,मानखुर्द ,शिवाजीनगर या मुस्लिम बहुल वस्तीत हुसैन यांच्या सभा होणार आहेत . Body:......Conclusion:
Last Updated : Apr 5, 2019, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.