मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजचा तुडवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णाचा दुर्देवी मृत्यू होत आहे. मात्र, राज्य शासन सुद्धा ऑक्सिजनसाठी हतबल दिसून येत आहे, अशा परिस्थिती मलाडमध्ये राहणारे शहनवाज शेख मात्र एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे सध्या 'ऑक्सिजन मॅन' चर्चेत आला आहे. आतापर्यत त्यांनी साडेपाच हजार गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोहचवले आहे.
आतापर्यंत ५५०० ऑक्सिजन सिलेंडर मदत -
कोरोनामुळे सध्या राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. मात्र. या संकट काळात मुंबईतील मलाड परिसरातील शहनवाज शेख अर्थात 'ऑक्सिजन मॅन' कोविड रुग्णांच्या मदतीसाठी धावून आली आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण सुद्धा वाचलेले आहे. गेल्या वर्षांपासून आतापर्यत साडे पाच हजार ऑक्सिज सिलेंडर गरजू लोकांना वितरित केले आहे. सध्या ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा पडत असल्याने दररोज शहनवाजाल ५०० ते कॉल येत आहे, तसेच शक्य होईल तितकी मदत सहनवाज करण्याचा प्रयत्न करत आहे.
येथून मिळाली प्रेरणा -
मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता. तेव्हा शहनवाज यांच्या मित्रांची बहिण ऑक्सिजन अभावी ऑटोरिक्षातच मृत्यू झालेला होता. जर वेळेत ऑक्सिजन मिळाले असते, तर कदाचित मित्राच्या बहिणीचे प्राण वाचले असते. त्यामुळे मुंबईतील कोविड रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला. लोकांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी शाहनवाजने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आणि वॉर रुमही बनवली आहे. रुग्णांच्या मदतीसाठी काही दिवसांपूर्वी आपली 22 लाखांची एसयुवी विकली होती. आपल्या फोर्ड एंडेवरच्या विक्रीनंतर मिळालेल्या पैशांनी शाहनवाजने 160 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करुन गरजूंपर्यंत पोहोचवले आहेत.
सरकार अपयशी -
कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या जलदगतीने होत आहे. तरी सुद्धा शासनाकडून गेला एका वर्षांत काही उपायोजना केल्या नाहीत. त्यामुळे आता ऑक्सिजन आणि औषधीचा तुटवडा पडला आहे. राज्य सरकारने जर यावर उपायोजना आगोदरच केली असती, तर आज ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू झाला नसता. त्यामुळे राज्य सरकारचे हे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया शहनवाज शेख यांनी 'ईटीव्ही भारता'ला दिली.
हेही वाचा - सकारात्मक..! शिवडीच्या 'या' प्रभागात नागरिकांनी मिळवला कोरोनावर विजय