मुंबई- दक्षिण मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी विकी कुमार चौधरी (२५) या आरोपीसह अन्य एकाला अटक केली आहे. ही घटना 10 जून रोजी घडली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी घराबाहेर कचरा टाकण्यासाठी आली असता, आरोपींनी तिला जबरदस्ती ओढून नेऊन घरात बंद केले. यानंतर दोन्ही आरोपींनी या मुलीवर बलात्कार केला आणि फरार झाले होते.
ही घटना पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर या संदर्भात पीडित मुलीच्या आईने कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीनंतर कफ परेड पोलिसांनी कलम 376(डी), 376(3) नुसार गुन्हा दाखला दोन्ही आरोपीना अटक केली आहे.