ETV Bharat / state

Parajamping : भयमुक्तीसाठी सत्तर वर्षीय रिटायर्ड कर्नलचे 16 हजार फुटावरुन पॅराजम्पिंग - parajumping from 16 thousand feet

पुण्यातील निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली ( Retired Colonel Girija Shankar Mungali ) यांनी सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या 1600 फूट उंचीवरून 70 व्या वर्षी पॅराजम्पिंग करून एक नवीन आदर्श केला आहे. भयमुक्ती हे धाडस केल्याचे त्यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना सांगितले

Retired Colonel Girija Shankar Mungali
वर्षीय रिटायर्ड कर्नलनी केले पॅराजम्पिंग
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:16 PM IST

पुणे : माणसाला आयुष्यात कशाची ना कशाची भीती असते. यासाठी माणूस काहीही करतो. एखाद्या गोष्टीची भीती मनात बसली की माणूस त्यापासून लवकर दूर जात नाही. त्यासा त्यातुन बाहेर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माणसाने आयुष्यात भयमुक्त व्हावे असे सांगत पुण्यातील निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली ( Retired Colonel Girija Shankar Mungali ) यांनी सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या 1600 फूट उंचीवरून 70 व्या वर्षी पॅराजम्पिंग ( parajumping ) करून एक नवीन आदर्श केला आहे.

वर्षीय रिटायर्ड कर्नलनी केले पॅराजम्पिंग

पॅराशूट ब्रिगेड महोत्सवच्या रीयुनियन : निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली यांनी पॅराशूट ब्रिगेड महोत्सवच्या रीयुनियन 2022 या उपक्रमात आग्रा येथे हे पॅराजम्पिंग केले. यावेळी त्यांच्या बरोबर 35 जण सहभागी झाले होते. यात गिरिजा शंकर मुंगली हे सर्वाधिक म्हणजेच 70 वर्षाचे होते. त्यांनी 1600 फूट उंचीवरून पॅराजम्पिंग केले. पॅराजम्पिंग मध्ये उंच उडी नव्हे तर सर्वात कमी उंची वरून पॅराजम्पिंग करणे अवघड समजले जाते. यात वेळ आणि परशुट हे योग्य वेळी उघडले जाणे महत्त्वाचे असते. हे धाडस निवृत्त कर्नल मुंगली यांनी अवघ्या सत्तराव्या वयात करून दाखवले.

सहासिक विभागाचे प्रमुख : निवृत्त कर्नल गिरिजा शंकर मुंगली हे आर्मीमध्ये सहासिक विभागाचे प्रमुख होते. त्यांनी आर्मी मधील लाल कॅप साठी पॅराजम्पिंगला सुरवात केली. पाहता पाहता ते या विभागाचे प्रमुख देखील झाले. अर्मिमधील काळात त्यांनी देशभरात 100 हून अधिक पॅराजम्पिंग केले आहे. तसेच विविध देशांबरोबर रिव्हर राफ्टिंग करून देशाचे नेतृत्वही केले आहे.

भयमुक्त होऊन जगा : मुंगली आपल्या अनुभवा बाबत म्हणाले की, मी हे जे पॅराजम्पिंग केले. ते भयमुक्त आणि माझ्या शाळेतील मुलांसाठी केले आहे. आयुष्यात जगताना आपण भयमुक्त होऊन जगले पाहिजे. तरच आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. आपण जर कोणत्याही भीतीमध्ये जगलो की नेहेमी काहीही करताना भीती वाटत असते.आणि हीच भीती दूर व्हावी म्हणून मी पॅराजम्पिंग केले. तसेच आमच्या येथील शाळेतील मुलांसाठी तसेच स्पोर्ट बाबत मुलांच्या मध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे पॅराजम्पिंग केले आहे. असे त्यांनी सांगितले.आत्ता त्यांनी संस्कृत शाळा सुरू केली असून यात विविध उपक्रम सध्या राबविले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.