मुंबई- राज्यात आज कोरोना १७ हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्यात ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ९१ हजार २५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण बरे झाले.
-
राज्यात आज 17066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15789 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 755850 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291256 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.16% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यात आज 17066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15789 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 755850 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291256 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.16% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 14, 2020राज्यात आज 17066 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15789 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 755850 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 291256 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.16% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 14, 2020
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ७७ हजार ३७४ झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार ५६६ हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात ३६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २९ हजार ८९४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७७ टक्के एवढा आहे.
राज्यात आज १५ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ७ लाख ५५ हजार ८५० रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.१६ टक्के आहे.
हेही वाचा-मराठा समाजाला आठ दिवसात न्याय द्या; अन्यथा.., मराठा आरक्षण याचिकाकर्त्याचा इशारा