ETV Bharat / state

IAS TRANSFER : राज्यातील 'सात' सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी वर्णी लावली आहे. ते २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

author img

By

Published : Jul 10, 2021, 12:06 AM IST

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/09-July-2021/12411053_thumnbnail_2x1_.jpg
राज्यातील 'सात' सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका राज्य सरकारने लावला आहे. ३० जूनला सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर शुक्रवारी पुन्हा सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूरमध्ये तीन अधिकाऱ्यांचे खांदेपालट केली आहे.

अशा झाल्या बदल्या -

  1. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी वर्णी लावली आहे. ते २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  2. अन्न व पुरवठा विभागातील सचिव व्ही. बी. पाटील यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. ते २०००च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  3. एमएसआरडीसी मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचाकल विजय वाघमारे (२००४) यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे.
  4. विमला आर. यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या २००९ बॅचच्या अधिकारी आहेत.
  5. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावरून पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदावर डॉ. राजेंद्र भारूड यांची वर्णी लावली आहे. ते २०१३च्या बॅचचे अधिकारी आहेत.
  6. नागपूरच्या अतिरिक्त पालिका आयुक्तपदावरून जलज शर्मा यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ते २०१४च्या बॅचचे अधिकारी आहेत.
  7. नागपूरच्या आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त मनिषा खत्री यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे. त्या २०१४ च्या बॅचच्या अधिकारी आहेत.

हेही वाचा - तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका; राज्य सरकार अलर्टमोडवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.