ETV Bharat / state

CM Mamata Banerjee : ममता बॅनर्जी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 21 जानेवारीला सत्र न्यायालय देणार निकाल - राष्ट्रगीत अवमान प्रकरण

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी (National anthem contempt case) वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात याचिका करण्यात आली होती. या याचिकेवर 21 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. भाजपचे नेते विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता याचिका दाखल केली होती.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jan 3, 2023, 2:06 PM IST

Updated : Jan 3, 2023, 8:42 PM IST

सरकारी वकील सुमेश पंजवानी माहिती देताना

मुंबई - गेल्यावर्षी 3 डिसेंबरला मुंबईत एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी राष्ट्रगीत सुरू (National anthem contempt case) असतानाच स्टेज सोडून निघून गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर भाजप मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी राष्ट्रगीत अनादर केल्याप्रकरणी, ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी शिवडी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाने ममता बॅनर्जी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान या सुनावणीवर 21 जानेवारी सत्र न्यायालय निकाल देणार आहे.

न्यायलयातील युक्तीवाद : आज झालेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबईतील दौरा हा राजकीय होता. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्या CM असल्यानं CM प्रोटोकॉल पालन करून सिक्युरिटी देण्यात आली होती. 2024 मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, त्यांची इतर सर्व राजकीय पक्षांसोबत एकत्रित बैठक साठी मुंबईत आल्या होत्या. ममता बॅनर्जी यांची मुंबई भेट हा पॉलिटिकल अजेंडा होता असे सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप : मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 1 डिसेंबर 2021 रोजी पार पडलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या उभे राहून पुढे राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या. ही क्लिप सोशल मिडियावर पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. बॅनर्जीचे कृत्य म्हणजे राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर असून 1971 राष्ट्रीय सन्मानाच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार त्या शिक्षेस पात्र असल्याचा दावा गुप्ता यांनी केला.

कारवाईला स्थगिती कायम : दंडाधिकारी न्यायालयाने 2 मार्च 2022 रोजी ममता बॅनर्जी यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी जेष्ठ कायदेतज्ज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने त्यांच्या दौऱ्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर दाखल करण्यासाठी सरकारी वकिलांनी वेळ मागितला. त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 3 जानेवारी रोजी निश्चित केली आणि तोपर्यंत दंडाधिकारी न्यायालयाच्या कारवाईला दिलेली स्थगितही कायम ठेवली.

भाजपच्या गुप्ता यांनी केली होती तक्रार : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी कोर्टा समोर आईपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणारी याचिका भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी दाखल केली होती.

काय आहे प्रकरण ? : ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यांनी चार ते पाच ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

Last Updated : Jan 3, 2023, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.