ETV Bharat / state

Sam DSouzaS bail : सॅम डिसुझाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नाकारला

author img

By

Published : Jun 14, 2023, 6:44 PM IST

सॅम डिसुझाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नाकारला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण टीम समोर चौकशीसाठी हजर होण्यात सॅमला काहीही अडचण नाही असे कोर्टात स्पष्ट करण्यात आले. सॅम डिसूजाच्या वकिलांनी न्यायालयात याप्रकारचा दावा केला.

Etv Bharat सत्र न्यायालयाने नाकारला
Etv Bharat सत्र न्यायालयाने नाकारला

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये समीर वानखेडे तसेच सहआरोपी सॅम डिसूजा देखील आहे. याच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्याला उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण नाकारले. सत्र न्यायालयामध्ये आज अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी याचिकेवर सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने सॅम डिसूझा याला जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे सीबीआयच्या चौकशीत आता सॅम डिसूजाला बिन बोभाट सहकार्य करावे लागेल.

अटकेपासून संरक्षण मिळावे - दिल्लीमध्ये 2 ते 8 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डिसुझाला चौकशी तपासणी कामी त्या वेळेला बोलावले. परंतु बेकायदेशीरपणे आम्हाला ताब्यात घेतले गेले होते. त्या संदर्भात पुन्हा तसे घडू शकते. म्हणून आम्हाला अटकेपासून संरक्षण मिळावे, अशा स्वरूपाची याचिका सत्र न्यायालयात डिसुझाच्या वतीने दाखल केली गेली होती. न्यायालयाने मागच्या सुनावणी वेळी 14 जून पर्यंत सॅम डिसुझा याला दिलासा दिला होता. मात्र सीबीआयकडून आज त्याच्या जामीनाला विरोध केला गेला. त्याचे कारण त्याने चौकशीत सहकार्य करायला हवे. म्हणून त्याला जामीन देता कामा नये अशी बाजू सीबीआयच्या वतीने आज न्यायायलायत मांडण्यात आली.

नोटीस न देता कारवाई - जेव्हा सॅनव्हील डिसुझा हा त्याच्या घरी होता. तेव्हा सीबीआय एनसीबी यांनी त्याच्या घरावर धाड घातली. त्याला कोणतीही नोटीस न देता कारवाई केली. शिवाय तेव्हा मानसिक शारीरिक छळ देखील करण्यात आल्याचा आरोप डिसुझाच्या वाकील नाथ यांनी केला. तसेच संपूर्ण एफआयआर खोटी आहे. डिसुझाचा त्या कार्डेलिया क्रुझ प्रकरणात 25 कोटी रुपये शाहरुख खानच्या मुलाला सोडवण्या करिता घेतल्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. असे देखील डिसुझाची बाजू मांडताना वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले.

सरकारी पक्षाचे वकील पी के गायकवाड म्हणालेकी, सीबीआयने विशेष चौकशी पथक कायद्याच्या तरतुदी अंतर्गत स्थापन केले आहे. मात्र डिसुझा चौकशीस सहकार्य करीत नाही. म्हणून कस्टडी जरुरी असल्याची त्यांनी मागणी केली. त्यामुळेच चौकशीच्या वेळेला आता सॅम डिसूजा याला कोणतीही तक्रार न करता चौकशीसाठी सीबीआय म्हणेल तेव्हा हजर राहावे लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.