मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ( Navneet Rana Ravi Rana ) यांच्या विरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे खार पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयासमोर नियमित तारखेला हजर न राहिल्याने राणा दांपत्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने आज पुन्हा जामीन पात्र वॉरंट जारी केला (bailable warrant for non appearance on date ) आहे. त्यामुळे राणा दांपत्य यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणावर पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार( Sessions Court has again issued bailable warrant ) आहे.
उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा प्रकरणानंतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Chanting Hanuman Chalisa in front Uddhav Thackeray house ) होता. या प्रकरणात अनेक तारकांना गैरहजर राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन पात्र वॉरंट जारी केला होता. आज पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राणा दाम्पत्यांविरोधात पुन्हा जामीन पात्र वॉरंट जारी केला आहे. 5000 रुपयाचा जामीन पात्र वॉरंट असणार आहे.
शासकीय कामात अडथळा : तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खासगी मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्यावरून झालेल्या कारवाईदरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन तारखेला गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामीन पात्र वॉरंट जारी केला आहे. 5000 रुपयाचे जामीन वॉरंट असणार आहे. पुढीलसुनावणी पर्यंत न्यायालयात हजर राहून जामीन रद्द करावा लागणार आहे. जर राणा दांपत्यापुढील तारखेपर्यंत हजर न झाल्यास त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट देखील निघण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण : सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता.
पंतप्रधान मुंबईत : अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.