ETV Bharat / state

पावसाळी अधिवेशनात आमचे प्रश्न सोडवा, अन्यथा आत्मदहन करू; ज्येष्ठ नागरिकांचा सरकारला इशारा - ज्येष्ठ नागरिक

यापूर्वीदेखील शासनाकडे ज्येष्ठ नागरिकांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यभर जिल्हा, तालुकास्तरावर शांततापूर्ण मूकमोर्चे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासनाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पावसाळी अधिवेशनात आमचे प्रश्न सोडवा, अन्यथा आत्मदहन करू; ज्येष्ठ नागरिकांचा सरकारला इशारा
author img

By

Published : Jun 14, 2019, 8:24 AM IST

मुंबई - गेल्या कित्येक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही, तर मोठे जनआंदोलन या अधिवेशनाच्या काळात करणार असल्याची माहिती महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करण्याचा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला आहे.

पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवा; अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा

यापूर्वीदेखील शासनाकडे ज्येष्ठ नागरिकांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यभर जिल्हा, तालुकास्तरावर शांततापूर्ण मूकमोर्चे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासनाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मागील अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्ततादेखील केलेली नाही. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या -

अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद करण्यात यावी, श्रावण बाळ निवृत्तीवेतनात दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, दारिद्र रेषेखालील कुटुंबांची उत्पन्न मर्यादा सध्या 21 हजार रुपये असून ही मर्यादा वाढवावी, ज्येष्ठ नागरिक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून ही योजना सर्व शिधापत्रिकाधारक ज्येष्ठ नागरिकांना लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे, बंद मातोश्री वृद्धाश्रम सुरू करावे.

Intro:या पावसाळी अधिवेशनात वरिष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवा अन्यथा आत्मदहन करायला वरिष्ठ नागरिक तयार

गेल्या कित्येक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे आज मुंबईत पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती. त्यात त्यांनी सांगितले की , जर या पावसाळी अधिवेशनात वरिष्ठ नागरिकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर वरिष्ठ नागरिक आता मोठे जनआंदोलन या अधिवेशनाचा काळात करणार आहेत आणि शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करण्याचा इशारा वरिष्ठ नागरिकांनी सरकारला दिला आहे.

Body:यापूर्वीदेखील शासनाकडे वरिष्ठ नागरिकांनी प्रलंबित मागण्यांबाबत राज्यभर जिल्हास्तरीय तालुकास्तरावर मूक मोर्चे शांततापूर्ण आंदोलन साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही आणि गेल्यावर वेळेच्या विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता देखील केलेली नाही त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अन्यथा आत्मदहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे वरिष्ठ नागरिकांनी सांगितले

ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या मागण्या

अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद करण्यात यावी, श्रावण बाळ निवृत्तीवेतनात दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, दारिद्र रेषेखालील कुटुंबांची उत्पन्न मर्यादा सध्या 21 हजार रुपये ही मर्यादा वाढवावी, ज्येष्ठ नागरिक राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून ही योजना सर्व शिधापत्रिका धारक ज्येष्ठ नागरिकांना लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे ,बंद मातोश्री वृद्धाश्रम सुरू करावे, अशा इतर मागण्या घेऊन वरिष्ठ नागरिकांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारने या अधिवेशनात आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा येत्या अधिवेश काळात आंदोलन करत, आम्ही आत्मदहन करू असा इशारा वरिष्ठ नागरिकांनी सत्ताधारी सरकारला दिला आहे.

Conclusion:ह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.