मुंबई : राज्यात बलात्कार, खून असे प्रकरणे रोज समोर येत असतात, असेच एक नवीन प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. त्यावेळी ती नग्न अवस्थेत होती. तिच्या खोलीला बाहेरून कुलूप होते. आतमध्ये गळ्यात 'दुपट्टा' बांधलेल्या अवस्थेत ती मृतावस्थेत आढळली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वसतिगृहात काम करणारा एक व्यक्ती घटनेपासून फरार आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने आत्महत्या केल्याचा संशय : गर्ल्स हॉस्टेलमधून फरार झालेला ओमप्रकाश कनोजिया हा कर्मचारी चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांकडून पकडले जाण्याच्या भीतीने त्याने लोकल ट्रेनखाली येऊन जीवन संपवल्याचा पोलिसांचा संशय आहे. कनोजिया हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. ओमप्रकाश कनोजीया याचे नातेवाईक मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मात्र, सीसीटीव्ही तपासणीवरून पोलिसांना मुलींच्या वसतिगृहातील फरार आरोपी हाच असल्याचा प्राथमिक तपासात अंदाज आलेला आहे.
कर्मचारी संशयास्पद अवस्थेत बेपत्ता : पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक टीमने विद्यार्थिनीच्या खोलीतील सामानाचे नमुना घेतला आहे. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ एकचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळपासून वसतिगृहात काम करणारा कर्मचारी संशयास्पद अवस्थेत बेपत्ता आहे. संशयित आरोपी हा हॉस्टेलमध्येच काम करणारी व्यक्ती असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- MBBS Student Suicide : नैराश्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिले भावनिक पत्र
- Boyfriend Attacked On Girlfriend: रात्र झाल्याने ती घराकडे निघाली, पण प्रियकराने अडविले; वाद अन् थेट...
- Police Raid On Resort : उमरेड कऱ्हांडला अभयारण्याजवळील रिसॉर्टमध्ये धिंगाणा, 6 नृत्यांगणासह 18 बड्या लोकांवर कारवाई