ETV Bharat / state

Mumbai Metro : मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल, मुंबई मेट्रो मार्ग तीनचे काम आता अंतिम टप्प्यात - Director Ashwini Bhide

बहुचर्चित केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मार्ग तीन आता अंतिम (work of Mumbai Metro Line 3 final stage) टप्प्यात आहे. मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग 3 ची दुसरी मेट्रो रेल्वे मुंबई शहरात नुकतीच (Second train for Metro 3 entered in Mumbai) दाखल झाली आहे. अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ संचालिका अश्विनी भिडे (Director Ashwini Bhide) यांनी दिली.

Mumbai Metro
मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल
author img

By

Published : Dec 31, 2022, 7:06 PM IST

मुंबई : बहुचर्चित केंद्र आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मार्ग तीन आता अंतिम (work of Mumbai Metro Line 3 final stage) टप्प्यात आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्ग आता आरे जंगलातील कारशेड डेपो ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत हा मार्ग सज्ज झालेला आहे. थोड्याच दिवसानंतर या ठिकाणी मेट्रो रेल्वे धावू शकेल. त्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग 3 ची दुसरी मेट्रो रेल्वे मुंबई शहरात नुकतीच दाखल (Second train for Metro 3 entered in Mumbai) झाली आहे.

Mumbai Metro Railway
मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल

गतिमान वाटचाल : शिंदे - फडणवीस शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प. आधीच्या महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने आयआयटी मुंबईच्या अभ्यासकांच्या अहवालानंतर कांजूरमार्ग या ठिकाणी कारशेड डेपो करण्याचे ठरवले होते. तो निर्णय रद्द करून, हा डेपो अरे जंगलातच करण्याचा निर्णय फडणवीस-शिंदे शासनाने घेतला . त्यानंतर आता या प्रकल्पाची गतिमान वाटचाल होत आहे.

Mumbai Metro Railway
मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल

८ डब्यांची ट्रेन मुंबईत दाखल : २९ डिसेंबर २०२२ रोजी आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील ऑल्स्टॉम प्लांटमध्ये तयार झालेली दुसरी ८ डब्यांची ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. या ट्रेनच्या सारिपुत नगर आणि सहार येथील रॅम्प दरम्यान ५ किमीच्या अंतरावर आवश्यक चाचण्या घेतल्या जातील. प्रत्येकी ४२ टन वजनाचे हे सर्व ८ डबे ६४ चाकांच्या विशेष ८ ऍक्सेल ट्रेलरने १० दिवसांत आंध्र प्रदेशातून १,४०० किमी अंतर पार करत मुंबईत दाखल झाले आहेत. आणि दुसरी ट्रेन मुंबई शहरात दाखल होत असतानाच आरे या ठिकाणी चुकार डेपो आहे. त्यातून ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत भुयारी मार्ग यावर सर्व काम सज्ज झाले आहे.

Mumbai Metro Railway
मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल

कार्य जोमात सुरू : स्टॅटिक आणि डायनॅमिक अशा विविध चाचण्यांसह ट्रेनच्या इतर चाचण्या नियमितपणे सुरू आहेत. ओव्हरहेड कॉन्टॅक्ट सिस्टीम चे काम ५३ टक्के पूर्ण तर, वीज जोडणी प्रक्रिया बसवण्याचे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या व्यतिरिक्त १०५ सरकते जीने (एस्केलेटर)काम पूर्ण झाले आहे. तसेच १९ लिफ्ट आणि १० प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे तयार आहेत. आणि १२ प्रवासी माहिती डिस्प्ले सिस्टीम विविध स्थानकांवर बसवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रणालीतील इतर कामे जोमात सुरू आहेत.

Mumbai Metro Railway
मेट्रो-३ साठीची दुसरी ट्रेन शहरात दाखल

मेट्रो-३ मार्गाचा पहिला टप्पा तयार : मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ मार्गिका तीन संदर्भात संचालिका अश्विनी भिडे यांनी ई टीव्ही सोबत बातचीत करताना सांगितले की, 'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन २०२३ मध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गाचा पहिला टप्पा तयार आहे. आरे ते बीकेसी मुंबईकराच्या सेवेत आणण्यासाठी सज्ज आहे. नवीन वर्षात मेट्रो-३ मार्गावरील आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करणार आहोत. या मार्गासाठी कालच दुसऱ्या ट्रेनचे सर्व आठ डबे शहरात दाखल झाले असून, लवकरच ते एकत्र करून त्याची चाचणी घेतली जाईल. उल्लेखनिय बाब म्हणजे यापूर्वीच पहिल्या ट्रेनने १,५०० किमी पेक्षा जास्त ट्रायल रनद्वारे सर्व डायनॅमिक आणि स्टॅटिक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत', असेही भिडे (Director Ashwini Bhide) म्हणाल्या.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.