ETV Bharat / state

BEST Bus Caught Fire : १५ दिवसात बेस्टच्या दुसऱ्या खासगी बसला आग, प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - बेस्ट बस आग

बेस्टची शनिवार ११ फेब्रुवारी रोजी मातेश्वरी कंत्राटदार कंपनीची बस क्रमांक ४१५ एसआर ७७५७ ही स्पिझच्या दिशेने जात असताना अंधेरी चकाला गुरुद्वारा येथे आली असता पेट घेतला. गेल्या १५ दिवसात बेस्टच्या दुसऱ्या खासगी बसला आग लागल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

BEST Bus Caught Fire
बेस्टच्या दुसऱ्या खासगी बसला आग
author img

By

Published : Feb 11, 2023, 10:38 PM IST

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपला खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावरील बस घेतल्या आहेत. या बस प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहेत. या बसला सातत्याने आगी लागणे, रस्त्यावर मध्येच बस बंद पडणे यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

अंधेरी चकाला येथे बसला आग : बेस्टची शनिवार ११ फेब्रुवारी रोजी मातेश्वरी कंत्राटदार कंपनीची बस क्रमांक ४१५ एसआर ७७५७ ही स्पिझच्या दिशेने जात असताना अंधेरी चकाला गुरुद्वारा येथे आली असता पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्याने या दुर्घटनेत कोणीही प्रवासी जखमी झाले नसून आग कशामुळे लागली याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.‌ या प्रकरणी पुढील चौकशी स्थानिक पोलीस करत असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.‌

वांद्र्यात बसला आग : २५ जानेवारी रोजी बस मार्ग क्रमांक ५१ ही वांद्रे एस व्ही रोड जंक्शन येथे आली असता गिअर बाॅक्स मध्ये स्पार्क झाला आणि बसने पेट घेतला. यावेळी बस मध्ये २० ते २५ प्रवासी होते. मात्र बस वाहकाने वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्याने २५ प्रवासी थोडक्यात बचावले. या दुर्घटनेत कंडक्टर, ड्रायव्हर यांनी प्रसंगावधान दाखवल्याने कोणीही जखमी झाले नाही.

कांदिवलीत बसला आग : २७ ऑक्टोबर रोजी कांदिवली लोखंडवाला सर्कल येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे आज सायंकाळी सहा सव्वा सहाच्या सुमारास बस मार्ग क्रमांक २८८ वर धावणारी बस आली. अचानक ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये आग लागली. आग लागताच ड्रायव्हर आणि बाजूच्या नागरिकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन यंत्राच्या सह्यायाने साडे सहाच्या सुमारास आग विजवण्यात आली. ड्रायव्हर आणि उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान ठेवून वेळीच आग विजवल्याने कोणीही जखमी झाले नाही.
हेहा वाचा: Anganwadi Worker Suicide : धक्कादायक! अधिकाऱ्याने केली शरीरसुखाची मागणी; अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.