ETV Bharat / state

मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईकरांचा प्रतिसाद, दोन दिवसात ८ लाखांचे उत्पन्न

वडाळा ते संत गाडगे महाराज बाबा चौक(सातरस्ता) या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटन केले.

मोनो रेल
author img

By

Published : Mar 6, 2019, 11:40 AM IST

मुंबई - गेल्या २ दिवसांत मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्यातून मुंबई शहर रेल्वे प्राधिकरणाला ८ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. वडाळा ते संत गाडगे महाराज बाबा चौक(सातरस्ता) या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. या २ दिवसांत ४६ हजार ९७८ प्रवाशांनी प्रवास केला.

मोनो रेल

मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील वडाळा ते सातरस्ता दरम्यान कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी मोनोने प्रवास केला. यामध्ये मंगळवारी २३ हजार ३२१ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधुन ४ लाख १० हजार २८४ रुपये उत्पन्न मिळाले. तर सोमवारी २३ हजार ६५७ प्रवाशांनी प्रवास केला. यातून ४ लाख ४८ हजार ५३७ रुपये उत्पन्न मिळाले.

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेलमध्येही स्थानकांची नावे जुनीच देण्यात आली आहेत. या टप्प्यातील प्रवासी भाडे ५ रुपयांनी कमी करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. मोनोतून कामावर जाणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त मोनोतून प्रवासाचा आनंद घेण्यासाठी अनेक प्रवाशांनी कुटुंबासह प्रवास केला.

Intro:गेल्या दोन दिवसांत मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्यातून मुंबई शहर रेल प्राधिकरणाला 8 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर 46 हजार 978 प्रवाशांनी प्रवास केला.
वडाळा ते संत गाडगे महाराज बाबा चौक(सातरस्ता) या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी उद्घाटन केले.

Body:उद्घाटनानंतर सोमवारच्या महाशिवरात्रीच्या सुट्टीनंतर
कामाच्या प्रत्यक्ष दिवशी आज मोनोच्या दुसऱ्या टप्प्यातील वडाळा ते सातरस्ता दरम्यान कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी मोनोने प्रवास केला.
मंगळवारी 23,321 प्रवाशांनी प्रवास केला तर 4 लाख 10 हजार 284 रुपये उत्पन्न मिळाले. सोमवारी 23,657 प्रवाशांनी प्रवास केला तर 4 लाख 48 हजार 537 उत्पन्न मिळाले.

Conclusion:दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेलमध्येही स्थानकांची नावे जुनीच देण्यात आली आहे. तर या टप्प्यातील प्रवासी भाडे 5 रुपयांनी कमी करावे अशी मागणी प्रवाशांकडुन करण्यात आली आहे. मोनोतून कामांवर जाणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त जॉय राईडसाठी अनेक प्रवाशांनी कुटुंबासह प्रवास केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.