ETV Bharat / state

मुंबई पालिकेतील भंगार विक्रीत घोटाळा; भाजप नगरसेवक विनोद मिश्रांचा आरोप - bmc scrap saling scam alleged bjp

मुंबई महापालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वापरण्यात येणारे जुने पाईप भंगारात विकले जातात. सध्या १ लाख १८ हजार किलो वजनाच्या या लोखंडी तुकड्यांची भंगारात विक्री करण्यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे.

mumbai mnc
मुंबई मनपा
author img

By

Published : Aug 17, 2021, 5:42 PM IST

Updated : Aug 17, 2021, 6:36 PM IST

मुंबई - महापालिकेच्या भंगार विक्रीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणीही मिश्रा यांनी केली. कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून भाजपाकडून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपात आता आणखी एका नवीन आरोपात भर पडली आहे.

भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा याबाबत बोलताना

भंगार विक्रीत घोटाळा -

मुंबई महापालिकेकडून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी वापरण्यात येणारे जुने पाईप भंगारात विकले जातात. सध्या १ लाख १८ हजार किलो वजनाच्या या लोखंडी तुकड्यांची भंगारात विक्री करण्यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमला आहे. या विक्रीतून पालिकेला ३२ कोटी २६ लाख ७९ हजार रुपये मिळणार आहेत. या भंगार विक्रीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. कोणितीही निविदा प्रक्रिया न राबवता जुन्याच कंत्राटदाराला भंगार विक्रीचं कंत्राट दिल्यामुळे यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विनोद मिश्रा यांनी केली आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने उच्चशिक्षित दाम्पत्याने घेतला गळफास, कोराना रिपोर्ट आला निगेटिव्ह

जुन्याच कंत्राटदाराला भंगार विक्री -

महापालिकेच्या जुन्या मोठ्या लोखंडी जलवाहिन्यांचे तुकडे भंगारात देण्यासाठी पालिकेकडून नियमित कंत्राटदार नेमण्यात येतो. पालिकेने एक लाख किलो वजनाचे भंगार देण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता आधीच्याच कंत्राटदाराला काम दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाला. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या म्हणण्यानुसार पालिकेचे किमान पाच कोटींचे नुकसान झाले आहे. पालिकेने २०२०मध्ये भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्याकरिता जो अंदाजित दर काढला होता तो १८.१४ रुपये प्रति किलो इतका होता. तर कंत्राटदाराने ३२.२१ प्रति किलो या दराने भंगाराची खरेदी करण्याची तयारी दर्शवल्यामुळे त्याला मूळ कंत्राट दिले होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Last Updated : Aug 17, 2021, 6:36 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.