ETV Bharat / state

School Student Portal Closed : विद्यार्थ्यांचे आधार जोडणी करणारे पोर्टल आठ दिवसापासून बंद! शिक्षक चिंतेत - विद्यार्थी शालेय प्रवाहातून बाद होण्याची भीती

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आधार जोडणी करणारे शासनाचे पोर्टल आठ दिवसापासून बंद आहे. त्याचा परिणाम आता विद्यार्थ्यांच्या आधार जुळणी कामावर झाला आहे. हे आधार जुळणी काम पुर्णपणे थांबले आहे. तसेच, या परिस्थितीमुळे शिक्षक मुख्याध्यापकही चांगलेच त्रस्त झाले आहेत. ही जुळणी आणि अपडेट झाले नाही तर शाळेला अनुदान मिळणे आणि संच मान्यता मंजुरी होणार नाही. त्यामुळे शिक्षक वर्तुळात मोठी चिंता आहे.

School Student Portal Closed
विद्यार्थ्यांचे आधार जोडणी करणारे पोर्टल आठ दिवसापासून बंद! शिक्षक चिंतेत
author img

By

Published : Apr 9, 2023, 5:58 PM IST

मुंबई : सध्या राज्यात विद्यार्थ्यांचे आधार जोडणी करणारे शासनाचे पोर्टल बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनसह शिक्षकही अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, यावर राज्यातील शिक्षक मुख्याध्यापक क्षेत्रातून शासनाने ताबडतोब याच्यावर उपाययोजना करावी अशी विनंती केली आहे. तर, माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाने केंद्राऐवजी स्वतःची यंत्रणा वापरून हे कामे करावेत अशी सूचना देखील केली आहे. जर हे वेळेत झाले नाही तर, हजारो विद्यार्थी शाळेतून बाद होतील अशी भीती देखील त्यांनी यामध्ये व्यक्त केली आहे.

पोर्टल बंद पडल्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकही चिंतेत : कोणत्याही राज्यातील शाळांमध्ये संचित मान्यता होण्यासाठी त्या शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार जुळणी या शासनाच्या पोर्टलसोबत झाली पाहिजे. शासनाचे संच मान्यता संदर्भातील हे पोर्टल गेले आठ दिवस झाले बंद आहे. त्यामुळे जर विद्यार्थ्यांचे आधार अपडेट या पोर्टलला जुळले नाही, तर विद्यार्थ्यांचे नोंदणी होणार नाही. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक आठ दिवसांपासून वैतागलेले आहे. महाराष्ट्रातील अनुदानित शाळा तसेच शासकीय व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी बंधनकारक केली गेलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही संच मान्यतेला शालेय शिक्षण विभाग मान्यता देत नाही. संच मान्यता झाली तरच विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक किती हा विषय शासनाकडून मंजूर होतो. मात्र, ते संच मान्यता काम आठ दिवसांपासून शासनाचे पोर्टल बंद पडल्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापकही चिंतेत आहेत.

पोर्टल जुळणी झाल्याशिवाय अनुदान मिळत नाही : प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार नोंदणी, आधार नोंदणी झाल्यावर त्याचे अपडेट, हे सर्व कामे झाल्यावर संच मान्यता होते. संच मान्यता झाल्यावर त्या शाळेला अनुदान किती द्यायचे हे निकषानुसार शासन निश्चित करते. परंतु, हे सर्व काम बंद झाल्यामुळे याचा परिणाम म्हणून शिक्षकांची संख्या कमी भरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, अनुदान देखील न मिळण्याची यातून समस्या उद्भवू शकते. जर विद्यार्थ्यांची शासकीय पोर्टलला आधार जुळणी झाली नाही. अपडेट झाले नाही तर विद्यार्थ्यांची कमी नोंदणी होईल. विद्यार्थ्यांची कमी नोंदणी झाली म्हणजे शिक्षकांची संख्या देखील कमी होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यामध्ये सर्वाधिक ताण हा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर पडलेला आहे. याबाबत फेब्रुवारी महिन्यात देखील मुंबई विभागातून मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने शासनाला मागणी केली गेली होती. परंतु तिकडे लक्ष दिले नाही आणि हे पोर्टल पुन्हा आठ दिवसापासून बंद पडलेले आहे. अशी माहिती मुख्याध्यापक संघटनेचे पांडुरंग केंगार यांनी दिली.

शिक्षण विभागाने स्वतःची यंत्रणा या ठिकाणी वापरावी : यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे आणि माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, शालेय शिक्षण विभागाने स्वतःची यंत्रणा या ठिकाणी वापरली पाहिजे. मात्र, ते केंद्र शासनाची यंत्रणा वापरतात. केंद्र शासनाची यंत्रणा त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम करते. आणि महाराष्ट्राची कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळे हा निर्माण झालेला आहे. यामुळे विद्यार्थी हा शाळेच्या प्रवाहातून बाहेर फेकला जाईल. आणि शिक्षकांचे समायोजन हा मुद्दा देखील त्या अनुषंगाने समस्या म्हणून समोर येणारच आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाने याच्यावर ताबडतोब उपाययोजना केली पाहिजे. यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण निरीक्षक यांच्याकडे मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शासनाची बाजू त्यांच्याकडून समजू शकलेली नाही अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा : CM DCM Visited Ayodhya : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; मंदिर उभारणी कामाची केली पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.