ETV Bharat / state

शाळा सुरु नसताना मुंबई पालिकेकडून बुट, मोज्यांच्या खरेदीसाठी १२ कोटींच्या निविदा

author img

By

Published : Apr 19, 2021, 9:35 PM IST

मुंबईत सर्व महापालिकेच्या शाळा बंद आहेत. पण अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी कॅनव्हॉसचे बूट आणि काळे मोजे खरेदीसाठी १२ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. मात्र भाजपाने याला विरोध केला आहे.

Mumbai
Mumbai

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे गेल्यावर्षीच्या मार्चपासून लॉकडाऊन आहे. या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्याचप्रमाणे शाळाही बंद होत्या. आजही वर्षभरानंतर शाळा सुरु झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी कॅनव्हॉसचे बूट आणि काळे मोजे खरेदीसाठी १२ कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. मुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुढेही कशा शाळा सुरु होतील, याची शाश्वती नसताना या निविदा काढण्यात आल्या आहेत.

१२ कोटींच्या निविदा -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर २३ मार्चला देशभरात केंद्र सरकारने लॉकडाऊन लावला. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना परिक्षा न घेताच उत्तीर्ण करण्यात आले. या वर्षीही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईत रोज ८ ते ११ हजार रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे पुन्हा यावर्षीही शाळा सुरु होतील कि नाही याची शाश्वती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने मात्र कॅनव्हास बूट आणि काळे मोजे यांच्यासाठी १२ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत.

भाजपाचा विरोध -

मुंबई महापालिकेने १२ कोटींच्या निविदा मागवल्या असून त्याबाबत महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे. टाळेबंदीपूर्वी शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वस्तू उपलब्ध होत नसत. मग याच वर्षी इतकी घाई का? असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. पालिकेचा शिक्षण विभाग सध्या विद्यार्थ्यांना दृक् -श्राव्य माध्यमातून शिक्षणाचे धडे देत आहे. मात्र हजारो विद्यार्थी पालिका यंत्रणेच्या, शिक्षकांच्या संपर्कात नाहीत. घरातूनच ऑनलाइन वर्गांना हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बूट खरेदीची इतकी घाई का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला असून निविदेच्या प्रक्रियेनुसार ए व बी क्रमांकाची पाकिटे उघडण्यात आली आहेत. केवळ आर्थिक देयकाचे सी पाकीट उघडायचे आहे. या प्रकरणी निविदा रद्द करून ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू -

मुंबई पालिकेच्या ९४३ प्राथमिक शाळा असून त्यात सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तर २२४ माध्यमिक शाळांमध्ये ४१ हजार विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी महापालिकेकडून २७ शालेय वस्तू दिल्या जातात. यात वह्या, पुस्तके, गणवेश, डबा, कंपास, बूट, मोजे अशा विविध शैक्षणिक वस्तूंचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.