ETV Bharat / state

अकरावी प्रवेशासाठी होणार सीईटी परीक्षा; शालेय शिक्षण विभागाने घेतला निर्णय - सीईटी परीक्षा तारीख

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी परिक्षाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 25, 2021, 12:15 AM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी परिक्षाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत घोषीत होण्याची शक्यता आहे. त्यामूळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेसाठी सीईटीची तयारी करावी लागणार आहे.

जुलै किंवा ऑगस्टमध्ये होणार परीक्षा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द केली आहे. तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे अकरावीचे प्रवेश कशापद्धती याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम होता. मात्र, आता शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई व अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा शिक्षण आयुक्तांच्या देखरेखीखाली राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार असून, त्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत घोषीत होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये म्हणजे जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.

अशी होणार परीक्षा

दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा देण्यासंदर्भातील पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे. 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरलेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले असल्याने त्यांना सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, आयसीएसई व अन्य आंतरराष्ट्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून निश्चित केलेले शुल्क भरावे लागणार आहे. सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील. सीईटी परीक्षा 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल.

हेही वाचा - शासकीय अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांची मिळणार सूट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.