ETV Bharat / state

Mumbai School मुंबईत संसर्गजन्य आजारांचा प्रसार मात्र शाळेमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर नाही परिणाम - संसर्गजन्य आजारांची लेटेस्ट बातमी

मुंबई शहरात कोरोना विषाणूच्या ( Coronavirus In Mumbai ) संसर्गामुळे दोन वर्ष शाळा बंद होत्या. आता शाळा सुरू झाल्या असल्या, तरी शहरात डोळ्यांची साथ आली. त्यानंतर आता गोवरचा संसर्ग वेगाने परसरत आहे. मात्र संसर्गजन्य आजार ( infectious diseases Increase In Mumbai ) वाढत असताना शहरातील शाळांमधील उपस्थितीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) वतीने देण्यात आली आहे.

Mumbai Municipal Corporation
महापालिका शिक्षणाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Dec 15, 2022, 7:27 PM IST

मुंबई - शहरात गेल्या अडीच वर्षापासून कोरोना विषाणूचा प्रसार ( Coronavirus In Mumbai ) होता. हा प्रसार कमी होत असतानाच मुंबईत डोळ्यांची आणि गोवर या संसर्गजन्य आजारांची साथ ( infectious diseases In Mumbai ) आली आहे. कोरोना काळात दोन वर्षे मुंबईमधील शाळा ( School closed Due To Corona Lockdown ) बंद होत्या. मात्र सध्या संसर्गजन्य आजार पसरत असले, तरी शाळा रोजप्रमाणे सुरु असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

आजरांचे वाढते प्रमाण - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार ( Corona Virus Infection In Mumbai ) सुरु झाला. हा प्रसार सुरु होताच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यवहार बंद होते. शाळा कॉलेजही बंद होते. दोन वर्षांनी कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यावर शाळा नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरु झाल्या. शाळा सुरु होताच मुंबईत डोळ्यांची साथ आली. डोळ्यांची साथ आटोक्यात येते न येते तोच मुंबईसह महाराष्ट्रात गोवरचा प्रसार ( Measles Spread In Mumbai ) सुरु झाला. मुंबईत थंडी सुरु झाल्यावर वातावरण बदल झाल्याने ताप सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. विशेष म्हणजे लहान मुलांमध्येही सर्दी आणि खोकल्याचे आजार दिसून येत आहेत.

उपस्थितीवर परिणाम नाही - मुंबईमध्ये डोळे येणे, गोवर, ताप सर्दी खोकला यासारखे आजार दिसून येत आहेत. मात्र त्यामुळे शाळेमधील उपस्थितीवर मोठा कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या मुलाला लक्षणे दिसून येत आहेत, त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून त्या मुलांना घरी पाठवले जाते. डॉक्टरांकडून उपचार केल्यावर ती मुले बरी झाल्यावर पुन्हा शाळेत येतात. व्हाटसअॅपवर शाळेचा अभ्यास पालकांना पाठवला जातो. पालकसुद्धा आपली मुले आजाराची असल्यास शाळेत पाठवत नाहीत. मुलांमध्ये आजारांचा प्रसार कमी आहे. त्यामुळे शाळांमधील उपस्थितीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागातील ( Mumbai Municipal Corporation Officer ) अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईमधील आजरांची स्थिती - मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. आतापर्यंत कोरोनाच्या ११ लाख ५५ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १९ हजार ७४५ मृत्यू झाले आहेत. ० ते ९ वर्षापर्यंतच्या २३ हजार ७६३ मुलांना कोरोना झाला. त्यापैकी ३१ मुलांचा मृत्यू झाला. तर १० ते १९ वयामधील ६१ हजार ७७४ मुलांना कोरोना झाला त्यापैकी ६७ मुलांचा मृत्यू झाला. गेले अडीच महिने गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत ५०१७ संशयित तर ४७२ निश्चित निदान झालेले गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. गोवारमुळे आतापर्यंत १६ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १३ बालके मुंबईमधील असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने ( Mumbai Corporation Health Department ) दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.