ETV Bharat / state

Justice Gangapurwala : मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांची शिफारस - Madras High Court

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने बुधवारी न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून महत्त्वाची शिफारस केली आहे.

High Court
एस.व्ही. गंगापूरवाला यांची नियुक्ती
author img

By

Published : Apr 20, 2023, 7:13 AM IST

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही गंगापूरवाला यांना पदोन्नती देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच महत्त्वाची शिफारस केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल तसेच के. एम जोसेफ आणि भारताचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कॉलेजियमने 19 एप्रिल 2023 रोजी गंगापूरवाला यांच्या पदोन्नतीबाबत ही शिफारस केली आहे. न्यायालयीन कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेले गंगापूरवाला यांना आता मद्रास येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची जबाबदारी चालून आली आहे.

महाराष्ट्रात केली ही कामे: महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असलेले एस व्ही गंगापूरवाला हे निष्णात वकील म्हणून अधिक कार्यरत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बॉम्बे मार्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, जळगाव जनता सहकारी बँक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या आर्थिक संस्थांचे त्यांनी वकील म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्रातील 90 ते 2000 या दशकामध्ये दंगल उसळली होती. त्या दंगली संदर्भातील न्यायमूर्ती माने आयोग यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू गंगापूरवाला यांनी जोरदारपणे मांडली होती.

लवकरच मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश: 11 डिसेंबर 2022 रोजी गंगापूरवाला यांना मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. तत्पूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 13 मार्च 20210 रोजी त्यांनी कार्यभार सुरू केला होता. एस व्ही गंगापूरवाला यांच्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने असे म्हटले आहे की, मागील चार महिन्यांमधील देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उच्च न्यायालय येथे, हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून जे काही कामाचा अनुभव आहे, तो त्यांना मद्रास येथील न्यायमूर्ती म्हणून न्याय देण्यासाठी अत्यंत फलदायी आणि उपयुक्त ठरेल. मद्रास उच्च न्यायालयातील कॉलेजियमने आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयामधील कॉलेजियम यांनी शिफारस केल्यामुळे आता लवकरच मुंबई उच्च न्यायालयातून कार्यभार एस व्ही गंगापूरवाला यांना सोडावा लागणार आहे. तसेच मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ते लवकरच कामकाज करतील अशी शक्यता आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची सुनावणी तहकूब 12 मे रोजी होणार पुढील सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.