मुंबई One Bharat Sari Walkathon : आज (10 डिसेंबर) मुंबईत देशातील सर्वात मोठ्या 'एक भारत साडी वॉकथॉन' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश आणि लोकसभा खासदार पूनम महाजन यांनी वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर उपस्थिती लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी 'एक भारत साडी वॉकथॉन'ला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे हिरवा झेंडा दाखवला. यापूर्वी सुरतमध्ये साडी वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.
काय म्हणाले पीयूष गोयल : या वॉकथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर झालेल्या भाषणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आज आपल्या बहिणींनी भारताचा सन्मान वाढवला आहे. आजच्या या वॉकथॉनमध्ये विविध प्रकारच्या साड्यांमध्ये भारताचा अद्भुत वारसा दिसतोय. हा वारसा संपूर्ण जग बघणार आहे. यात आपल्या देशाची उज्वल परंपरा, वारसा आणि संस्कृती दिसतेय. दरम्यान, या कार्यक्रमाचं आयोजन पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 'फिट इंडिया' आणि 'वोकल फॉर लोकल' या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी करण्यात आल्याचंही पीयूष गोयल यांनी सांगितलं.
-
#WATCH | Maharashtra: Union Minister of Textiles Piyush Goyal says, "Let's start it (Walkathon) now... I just want to say, this is a wow. So beautiful, so elegant, looking like a wow..." https://t.co/fAgvl4rrmE pic.twitter.com/dtf96uczK5
— ANI (@ANI) December 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Union Minister of Textiles Piyush Goyal says, "Let's start it (Walkathon) now... I just want to say, this is a wow. So beautiful, so elegant, looking like a wow..." https://t.co/fAgvl4rrmE pic.twitter.com/dtf96uczK5
— ANI (@ANI) December 10, 2023#WATCH | Maharashtra: Union Minister of Textiles Piyush Goyal says, "Let's start it (Walkathon) now... I just want to say, this is a wow. So beautiful, so elegant, looking like a wow..." https://t.co/fAgvl4rrmE pic.twitter.com/dtf96uczK5
— ANI (@ANI) December 10, 2023
फिटनेसबद्दल जागरूकता वाढेल- पुढं ते म्हणाले की, 'एक भारत साडी वॉकथॉन'चा उद्देश भारताला विविधतेत एकता असलेला देश दाखवणं आणि देशभरातील महिलांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करून भारतातील हातमाग साडी संस्कृतीचा प्रचार करणे असा आहे. यातून महिलांची साडी परिधान करण्याची शैली आणि कला जगाला कळेल. तसंच यातून आपल्या पारंपारिक कापडाच्या पेहरावाला आणि वोकल फॉर लोकल च्या कल्पनेला अधिक बळ मिळून प्रसार होईल. यातून महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्यामध्ये फिटनेसबद्दल जागरूकता वाढेल.
साडीमध्ये अनेक महिलांची हजेरी : दरम्यान, मुंबईच्या बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला, बॉलीवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी, खेळाडू, व्यावसायिक महिला, डिझाइनर, सोशल मीडिया सेलिब्रिटी, गृहिणी, संगीत क्षेत्रातील महिला आणि इतर अनेक उत्साही महिला त्यांच्या विशिष्ट पारंपारिक पोशाखात सहभागी झाल्या.
हेही वाचा -
- Onion Farmers Issue : केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, पियूष गोयल यांचे धनंजय मुंडेंना आश्वासन
- MSP Of Grains Increased : मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट, तांदूळ व डाळींच्या MSP मध्ये केली भरघोस वाढ
- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचं पीयूष गोयल यांच बैठकीत आश्वासन, रविकांत तुपकर यांनी दिला आठ दिवसांचा अल्टीमेट