मुंबई : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने याला एचआयव्ही (HIV) हा दुर्धर आजार असल्याचे वैद्यकीय चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेला 14 दिवस उलटूनही साने याने हत्या कशी केली, याचे गूढ अद्याप पोलीस उलगडू शकलेले नाही.
मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले : मीरा रोड येथे राहणार्या मनोज साने (56) याने त्याची कथित पत्नी सरस्वती वैद्य (32) हीची 4 जून रोजी हत्या केली होती. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकर मध्ये शिजवले होते. हा प्रकार 7 जूनच्या रात्री उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळावरूनच साने याला अटक केली होती. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे अनेक पुरावे पोलिसांकडे आहेत. मात्र त्याने सरस्वतीची हत्या कशी केली ते अद्याप पोलिसांना उलगडता आलेले नाही. सरस्वतीने विष प्राशन करून आत्महत्या केली, त्यानंतर घाबरून मी मृतदेहाची विल्हेवाट लावली, असेच साने पोलिसांना सांगत आहे. पोलिसांना त्याच्या घरातून किटकनाशकाची बाटली देखील सापडली आहे.
घरी एचआयव्हीची औषधे सापडली : सरस्वतीच्या मृतदेहाच्या व्हिसेरा पोलिसांनी तपासणीसाठी न्याययवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. मनोज साने याने स्वत:ला दुर्धर आजार असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे त्या आजाराची औषधे देखील तो दररोज घेत होता. पोलिसांच्या झडतीत त्याच्या घरी एचआयव्ही आजारावरील औषधे सापडली होती. त्याची खात्री पटविण्यासाठी पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यात त्याला एचआयव्ही आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेटिंग अॅपवर सक्रिय होता साने : मनोज साने याने सरस्वतीशी काही वर्षांपूर्वी वसईच्या तुंगारेश्वर येथील मंदिरात लग्न केले होते. दोघांमध्ये मतभेद होते. साने डेटिंग अॅपवरही सक्रिय होता. त्याच्या मोबाईल फोनच्या तपशीलाच्या आधारे त्याच्या संपर्कातील लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. सरस्वतीचा मोबाईल फोन देखील मनोज सानेच वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी सरस्वतीच्या बहिणीने आत्महत्या केली होती.
हेही वाचा :