ETV Bharat / state

मुख्य सचिव अजोय मेहता निवृत्त, राज्याच्या प्रशासनाचा गाडा संजीव कुमारांनी स्वीकारला - अजोय मेहता निवृत्त

अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हाच अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता ते निवृत्त झाले असून संजीव कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे.

sanjiv kumar chief secretary of maharashtra  maharashtra new chief secretary  ajoy mehta advisor of cm  महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव  महाराष्ट्र मुख्य सचिव संजीव कुमार  अजोय मेहता निवृत्त  अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
राज्याच्या प्रशासनाचा गाडा संजीव कुमारांनी स्वीकारला
author img

By

Published : Jun 30, 2020, 6:02 PM IST

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे निवृत्त झाले असून त्यांनी राज्याचे नवे सचिव संजीव कुमार यांच्याकडे पदभार सोपवला. कुमार यांनी मेहतांकडून सूत्रे स्वीकारली आहेत. तसेच आता अजोय मेहता हे मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजोय मेहता यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हाच अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता ते निवृत्त झाले असून संजीव कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. कुमार हे राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी असून गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाने अजोय मेहता यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे 1 जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची चर्चा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.