ETV Bharat / state

किरीट सोमैया गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडतोय, ही त्यांना शेवटची वॉर्निंग - संजय राऊत - संजय राऊत यांचे किरीट सौमयांना उत्तर

भाजपाचे माजी खासदार किरीट सौमया यांनी मुख्यमंत्र्यांनी विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सौमया यांच्यावर जोरदार पलटवार केला.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Nov 13, 2020, 2:41 PM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत. त्यांच्या आरोपांमुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत किरीट सोमैया यांच्यावर हल्ला चढवला.

किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपावर खा. संजय राऊत म्हणाले, अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण हे वेगळे आहे. आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं. ते अनेक महिन्यांपासून न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते काहीही बोलायला तयार नाहीत. २०१४ सालचे हे जमिनीचे कायदेशीर व्यवहार आहेत. २१ व्यवहार केले आहेत. ते दाखवावेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे. मराठी माणसांनी व्यवहार केले, ते डोळ्यात खुपतंय का? किरीट सोमैयांनी कितीही फडफड केली तरी, त्यातून काही निष्पन्न होणार नाही.

अन्वय नाईक परिवार आणि तुमचे काय संबंध-

किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे नाईक कुटुंबीयांशी जमीनव्यवहार असल्याचा आरोप केला. यानंतर अद्याप उद्धव ठाकरेंनी कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही. शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यात दम असेल तर मला उत्तर द्या, असे आव्हान सोमैयांनी दिले आहे. मुरुड येथील जमिनीबाबत विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे द्या, असे ते म्हणाले. अन्वय नाईक परिवार आणि तुमचे काय संबंध आहेत, हे जनतेला ऐकायचे आहे, अशा प्रकारे सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ही शेवटची वॉर्निंग-

किरीट सौमया हे गिधाडसारखा पेपर घेऊन फडफडत आहेत. ही त्यांना शेवटची वॉर्निंग आहे, असे शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ईडी यांच्या बापाची आहे का? असा प्रश्नही राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. मराठी माणसाने व्यवहार केलेले खुपत आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. जे काही व्यवहार झाले आहेत. ते कायद्याच्या चौकटीत राहून केलेले आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

सोमैया यांनी केलेले आरोप खोटे, भंपक -

भाजपावर टीका करताना राऊत म्हणाले, तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. तुमच्या अशा सवयीमुळे जनतेने तुम्हाला पाच वर्ष घरी बसवल आहे. त्यांना कितीही फडफड करु द्या, त्यांना काहीही निष्पन्न होणार नाही. 21 व्यवहार केल्याचा आरोप सोमैया करत आहेत. कधी केले? सत्ता नाही तर, काहीही बोलणार का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थीत केला. एका महिलेचं कुंकू पुसलं गेले आहे. त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते अन्वय नाईक आत्महत्याबाबत बोलत नाहीत. मराठी भगिनीच कुंकू पुसलं गेलं त्याबाबत बोलत नाहीत. सोमैया यांनी केलेले आरोप खोटे, भंपक आहेत. रोज सकाळी ते आरशात स्वतःची प्रतिमा पाहतात आणि मग त्यांना भ्रष्टाचार दिसतो. मराठी माणसाची प्रगती किरीट सोमैया यांना पाहावत नाही, असे राऊत म्हणाले.

सगळे बडबडणारे ईडीचे दलाल-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकत घेतलेल्या जमिनीची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. यावर राऊत म्हणाले, ईडी यांच्या बापाची आहे का? असं असेल तर त्यांनी सांगायला हवं. हे सगळे बडबडणारे ईडीचे दलाल आहेत. अशा व्यापाऱ्यांना, दलालांना आम्ही घरी बसवले असून त्यांना पुढील 25 वर्षे घरीच बसवू.

हेही वाचा- ठाकरे कुटुंबीयांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी... किरीट सोमय्यांची जनहित याचिका

हेही वाचा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवा; शिवसैनिकाची राष्ट्रपतींकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.